इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शाळा म्हणजे विद्यामंदिर होय. त्यातच गुरू-शिष्याचे नाते अत्यंत पवित्र मानले जाते. सहाजिकच शिक्षक हे विद्यार्थी वर्गाला संस्कार देत असतात. परंतु काही शिक्षक मात्र वाईट कृत्य करतात आणि त्याचा समाज मनावर विपरीत परिणाम होतो. केरळमध्ये अशीच एक अमानुष आणि लज्जास्पद घटना घडली.
एका शिक्षकाने आपल्या अनेक शाळकरी विद्यार्थिनींवर 30 वर्षांपासून लैंगिक अत्याचार केले. आतापर्यंत 75 पीडित मुली समोर आल्या असून या प्रकरणी गुन्हा शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षकाचे लज्जास्पद कृत्य समाजासमोर उघडकीस आले आहे. केव्ही शशी कुमारने तीस वर्षे आपल्या शाळेतील विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केले.
विशेष म्हणजे हे प्रकरण उघडकीस आले, तेव्हा त्या शिक्षकाने सोशल मीडिया पोस्टवर स्वतःला एक आदर्श शिक्षक म्हणून वर्णन केले. त्यावर पीडित मुलींनी त्याचे काळे कारनामे उघड केले. आतापर्यंत 75 प्रकरणे समोर आली आहेत. 500 हून अधिक विद्यार्थिनींचे शोषण होण्याची भीती आहे. विशेष म्हणजे शशी कुमार हा मलप्पुरममध्ये सीपीआय(एम) नगरसेवक होता. तसेच, अनुदानित शाळेत 38 वर्षे शिक्षक होता.
शशी कुमार याच्या निवृत्तीनिमित्त त्यांना शाळेने निरोप समारंभ दिला. त्याने सोशल मीडियावर स्वत:ला एक ‘आदर्श शिक्षक’ म्हणून संबोधले. यावर एका विद्यार्थिनीने लिहिले की, कसे वर्षांपूर्वी शशी कुमार तिचे लैंगिक शोषण करायचे. शशी यांनी याला शिक्षक संघाच्या परस्पर गटबाजीतील आरोप म्हटले, लवकरच अनेक विद्यार्थिनी एक एक करून पुढे आल्या, त्यानंतर गुन्हा दाखल झाला.
भयानक प्रकार शशी कुमार शाळेच्या उच्च प्राथमिक विभागात शिकवायचे, या 30 वर्षांत त्यांनी 9 ते 12 वर्षांच्या मुलींचे जास्त शोषण केले. एका विद्यार्थिनीने सांगितले की ती 1988 च्या बॅचमध्ये होती, शशी कुमारने प्रत्येक वर्गात 5-6 मुलींवर अत्याचार केले. शाळेकडे तक्रार केली, पण काहीच झाले नाही.