बुधवार, नोव्हेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कुख्यात सेक्स रॅकेट क्वीनचे साम्राज्य पाहून पोलिसही चक्रावले; कोण आहे ती? काय आहे प्रकरण?

जानेवारी 13, 2022 | 4:39 pm
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सामान्य कुटुंबातून आलेल्या मुलीने दहावीनंतर शाळेत जाणे सोडून दिले होते. परंतु ती इतकी लफ्फेदार इंग्रजी बोलत होती, की चांगले शिकलेले लोक लाजतील. या मुलीचे मोठमोठे छंद होते. या ओघात ती देहविक्रय व्यवसायात जोडली गेली. पाहता पाहता तिने मोठे नेटवर्क बनवले. त्यानंतर सेक्स रॅकेटची क्वीन अशी तिची ओळख बनली. या मुलीचे नाव आहे गीता अरोरा ऊर्फ सोनू पंजाबन.

रिक्षाचालक वडील
मूळच्या हरियाणामधील रोहतक जिल्ह्यातील रहिवासी गीताचा जन्म दिल्लीच्या गीता कॉलनीत १९८१ साली झाला होता. खूपच सामान्य कुटुंबातून येणार्या गीता अरोराचे वडील पोट भरण्यासाठी रिक्षा चालवत होते. परंतु लहानपणापासूनच चमकदार जीवन जगण्याची इच्छा असलेल्या गीताने दहावीनंतर शिक्षण सोडून दिले. नंतर ती ब्यूटि पार्लर चालवू लागली.

ज्याच्यांशी लग्न केले त्यांचे मृत्यू
सुरुवातीपासून लहान-मोठे गुन्हे करणार्या गीताने रोहतकच्या कुख्यात गँगस्टर विजय सिंह याच्यासोबत लग्न केले. परंतु १९९८ मध्ये एसटीएफने विजय सिंहला एका चकमकीत ठार केले. विजयसोबत राहून तिने अनेक मोठ्या गुन्हेगारांशी संपर्क केला होता. त्यानंतर ती नजफगढच्या वाहनचोरी करणार्या दीपकला भेटली. परंतु २००३ मध्ये आसाम पोलिसांनी दीपकचे एन्काउंटर केले. याच वर्षी गीताने कॉल गर्लचे काम सुरू केले होते. त्याचदरम्यान तिची दीपकचा भाऊ हेमंत सोनूशी जवळीक वाढली. त्याच्याशी नंतर तिने लग्न केले. परंतु २००६ मध्ये हेमंतसुद्धा पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारला गेला.

EC अशी झाली सोनू पंजाबन
वर्ष २००६ मध्ये जेव्हा हेमंत सोनूचा मृत्यू झाला तेव्हा गीताने हेमंतचे सोनू हे आडनाव आपल्या नावाच्या आधी लावण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिने स्वतःची सोनू पंजाबन या नावाने ओळख बनवली. हेमंतच्या गुंडाच्या मदतीने एक सेक्स रॅकेट नेटवर्क तयार केले. या नेटवर्कमध्ये तिने दलालांच्या माध्यमातून देहविक्रय व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवला. त्यामुळे तिला २००७ आणि २००८ रोजी प्रीतविहार आणि साकेत पोलिसांनी अटक केली होती. नंतर ती जामिनावर बाहेर आली.

मकोका, पण त्यातून सुटका
२०११ मध्ये सोनूला देहविक्रय व्यवसायाशी संबंधित प्रकरणात अटक करण्यात आली होती. तिच्यावर या वेळी मकोका (महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम अॅक्ट १९९९) लावण्यात आला. सोनू देहविक्रय व्यवसायाचे रॅकेट चालवत असल्याचे पुरावे पोलिस सादर करू शकले नाहीत. परंतु याच कामातून सोनूने दिल्ली-हरियाणामध्ये कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केली होती.

एक केस आणि सोनू कारागृहात
एका मुलीने सोनू आणि संदीपवर अपहरण, बलात्कार आणि जबरदस्तीने देहविक्रय व्यवसायात ढकलण्यासह अनेक आरोप केले होते. मुलीने आरोप केला की, ती बारा वर्षांची असताना संदीपने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला आणि त्यानंतर दहा वेगवेगळ्या ग्राहकांना विकले. त्यानंतर ती सोनूकडे आली तेव्हा तिला सोनूने देहविक्रय व्यवसायात ढकलले. तिच्यावर अनेक प्रकारचे अत्याचार केले. तिच्या तावडीतून कशीबशी सुटका झाल्यावर मुलीने सोनू आणि संदीपविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली.

याच प्रकरणात दिल्लीच्या द्वारका न्यायालयाने सोनू पंजाबन आणि साथीदार संदीपला दोषी ठरविले होते. एक महिला असतानाही सोनूने नैतिकतेच्या सर्व सीमा पार केल्या. त्यामुळे तिची जागा कारागृहातच आहे, असे मत न्यायालयाने नोंदवले. या प्रकरणी सोनूला दोषी मानून २४ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. सोनूला शिक्षा झालेले हे पहिले प्रकरण आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ब्रेकअपनंतर सुष्मिता सेनने घेतले तिसरे मूल दत्तक? (व्हिडिओ व्हायरल)

Next Post

नर्मदा परिक्रमेविषयी इत्थंभूत माहिती देणारी अतिशय लोकप्रिय मालिका ‘नर्मदे हर’

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या, १२ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 11, 2025
crime1 1
इतर

नाशिक शहरात वाहनचोरी आणि घरफोडीचे सत्र सुरूच… एकाच दिवसात एवढे गुन्हे दाखल….

नोव्हेंबर 11, 2025
IITF 2025
महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत होणार भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 11, 2025
WhatsApp Image 2025 11 11 at 4.23.33 PM
महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट राज्य… या विजेत्यांची झाली घोषणा…

नोव्हेंबर 11, 2025
NMC Nashik 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर… बघा, कोणते प्रभाग झाले राखीव…

नोव्हेंबर 11, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

नगरपालिका निवडणुकीचा धुराळा सुरू असताना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे मोठे निर्णय…

नोव्हेंबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा मंगळवारचा दिवस… जाणून घ्या ११ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 10, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

दारू पाजून तरुणीवर बलात्कार… अश्लील फोटो व्हायरल करण्याचीही धमकी… मित्रासमवेत शरीरसंबंधांची बळजबरी…

नोव्हेंबर 10, 2025
Next Post
दत्ता भालेराव
ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक
मो. 9689038880

नर्मदा परिक्रमेविषयी इत्थंभूत माहिती देणारी अतिशय लोकप्रिय मालिका 'नर्मदे हर'

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011