India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

संतापजनक! नराधमांकडून गर्भवती महिलेवर सामुहिक बलात्कार; अखेर महिलेचा गर्भपात

India Darpan by India Darpan
October 6, 2022
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसात महिलांमधील अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्याने भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच बरेली येथे एक गर्भवती महिलेवर तिघा नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुर्दैव म्हणजे या महिलेचा गर्भपात झाला आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.  याप्रकरणी पोलीस कारवाई करत नसल्याने यामुळे पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांनी तीव्र  संताप व्यक्त करीत आहेत. तसेच, त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात आंदोलनही केले.

परिसरातील नागरिकांनी या दुर्दैवी आणि अमानुष घटनेची माहिती देताना सांगितले की, विशारतगंज हद्दीतील एका कुटुंबातील नवविवाहित महिला गर्भवती असताना शेतात काही कामासाठी गेली. शेतातून सायंकाळी ती घरी परत होती. त्याचवेळी तिला रस्त्यात एकटे गाठून आधार, अजय आणि नन्ही या तिघा नराधमांनी झुडपात नेले. तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. गर्भवती ही महिला बेशुद्ध पडल्याने तिघांनी तेथून पळ काढला.

रात्र झाली तरी सून घरी आली नाही, म्हणून तिच्या सासूने शोध करत शेत गाठले. तेव्हा आपली सुनबाई रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत आढळली. अखेर सासूने आरडाओरडा करीत सूनेला त्याच अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या दुर्दैवी अत्याचारात महिलेचा गर्भपातही झाला. एवढा सारा प्रकार होऊनही पोलिस काही करीत नसल्याने पीडितेचे कुटुंबिय व स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले. संतप्त सासूसह जमावाने पीडित महिलेचा गर्भ डब्यात भरून पोलिस अधिक्षक कार्यालय गाठले आणि आरोपांना अटक करण्याची मागणी केली.

Crime Pregnant Women Gang Rape Abortion
Uttar Pradesh Kanpur


Previous Post

तेल विक्रेते ते अब्जाधीश उद्योगपती; असा आहे अझिम प्रेमजी यांचा यशोप्रवास…

Next Post

‘सुख म्हणजे काय असतं’ मालिकेत नवा ट्विस्ट; नवरात्रीत ‘लक्ष्मी’चं आगमन

Next Post

'सुख म्हणजे काय असतं' मालिकेत नवा ट्विस्ट; नवरात्रीत 'लक्ष्मी'चं आगमन

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

January 28, 2023

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group