इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसात महिलांमधील अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्याने भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच बरेली येथे एक गर्भवती महिलेवर तिघा नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुर्दैव म्हणजे या महिलेचा गर्भपात झाला आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. याप्रकरणी पोलीस कारवाई करत नसल्याने यामुळे पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. तसेच, त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात आंदोलनही केले.
परिसरातील नागरिकांनी या दुर्दैवी आणि अमानुष घटनेची माहिती देताना सांगितले की, विशारतगंज हद्दीतील एका कुटुंबातील नवविवाहित महिला गर्भवती असताना शेतात काही कामासाठी गेली. शेतातून सायंकाळी ती घरी परत होती. त्याचवेळी तिला रस्त्यात एकटे गाठून आधार, अजय आणि नन्ही या तिघा नराधमांनी झुडपात नेले. तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. गर्भवती ही महिला बेशुद्ध पडल्याने तिघांनी तेथून पळ काढला.
रात्र झाली तरी सून घरी आली नाही, म्हणून तिच्या सासूने शोध करत शेत गाठले. तेव्हा आपली सुनबाई रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत आढळली. अखेर सासूने आरडाओरडा करीत सूनेला त्याच अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या दुर्दैवी अत्याचारात महिलेचा गर्भपातही झाला. एवढा सारा प्रकार होऊनही पोलिस काही करीत नसल्याने पीडितेचे कुटुंबिय व स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले. संतप्त सासूसह जमावाने पीडित महिलेचा गर्भ डब्यात भरून पोलिस अधिक्षक कार्यालय गाठले आणि आरोपांना अटक करण्याची मागणी केली.
Crime Pregnant Women Gang Rape Abortion
Uttar Pradesh Kanpur