ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपल्या लोकशाही प्रधान देशांमध्ये राजकीय वातावरणावर नेहमीच चर्चा होत असते. जणू काही प्रत्येक जण राजकारणातील आपल्याला खूप काही कळते असे समजून दुसऱ्याची मोठ मोठ्याने आपली बाजू मांडत असतो, तसेच काहीजण तर वादही घालतात. हा वाद कधी कधी प्रत्यक्षात तर कधी सोशल मीडियावर असतो. अगदी गावातील पारावरच्या गप्पांपासून ते अगदी मोठ्या शहरातील भव्य मंचावर असे राजकीय वाद रंगताना दिसून येतात, या वादात सर्वच वर्गातील आणि स्तरातील स्त्री पुरुष सहभागी होतात. परंतु या वादातून काही वेळा नुकसानही घडते .दोन राजकीय मतप्रवाह असलेले गट जेव्हा एकमेकांविरुद्ध उभे ठाकतात तेव्हा ते आपली बाजू जोरकस मांडण्याचा प्रयत्न करतात. असाच एक प्रकार कल्याणमध्ये घडला आहे.
एका चर्चेदरम्यान तर्कवितर्क लावले गेले. चर्चेतील एखादा मुद्दा पचनी पडला नाही, तर वाद विकोपाला गेला. किरकोळ कारणांवरून दोन कामगारांमध्ये राजकीय परिस्थितीवर चर्चा करताना वाद निर्माण झाला आणि त्यातून एकाने दुसऱ्याचे डोके फोडले. कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ हद्दीतील भांडी विक्रीच्या बाजारपेठेत असलेल्या एका दुकानात हा सर्व प्रकार घडला.
यूट्यूब चॅनलवर दाखविल्या जाणाऱ्या राजकीय विषयावर चर्चा सुरू होती. देशावर किती कर्ज आहे? बजेट काय मांडले आहे? नेमकी काय परिस्थिती आहे? ही चर्चा सुरू असताना तसेच राज्यातील किंवा देशातील सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर ठिकठिकाणी चर्चा सुरू असते. देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा सुरू असताना ती विकोपाला गेली. त्यात एका दुकानातील कामगाराने दुसऱ्या दुकानातील कामगाराला मारले.
धीरज हा काही जणांसोबत चर्चा करीत होता. या चर्चेत कामगार मनीष गुप्ता हा देखील सहभागी झाला होता. धीरजने जो मुद्दा चर्चेच्या दरम्यान उपस्थित केला. तो मनीषला पटला नाही. मनीषने थेट कुकरचे झाकण उचलून धीरजच्या डोक्यावर मारले. या घटनेत धीरज पांडे हा तरुण जखमी झाला आहे. हल्ला करणारा दुसरा तरुण मनीष गुप्ता याच्याविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. आता या प्रकरणाची संपूर्ण कल्याण मधील बाजारपेठेत चर्चा सुरू आहे. राजकीय वाद एकमेकांशी घालावा, परंतु हाणामारी करू नये असे काही ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी भावना व्यक्त केली.
Crime Politics Discussion Beaten Head Injury
Kalyan Mumbai