मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोबाइल चार्जिंगला लावण्याच्या नादात ब्रेकऐवजी ॲक्सिलेटरवर पाय पडल्याने ओला चालकाच्या रिक्षाचालक मित्राने ५० मीटरपर्यंत वाहनांसह पादचाऱ्यांना चिरडल्याची धक्कादायक घटना घाटकोपरमध्ये घडली. या घटनेत सात जण जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात पोलिसांनी चालक राजू रामविलास यादव याला अटक केली आहे.
पंतनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविदत्त सावंत यांनी याविषयी माहिती दिली आहे. घाटकोपर येथील कामराज नगर परिसरात राजू यादव हा रिक्षाचालक राहतो. ओलाचालक मित्राच्या टूरिस्ट कारमध्ये मोबाइल चार्जिंग करण्यासाठी तो बसला होता. चार्जिंग सुरु करण्यासाठी त्याने गाडी सुरु केली. मात्र गाडी सुरु होताच राजू गोंधळला आणि त्याने ब्रेकऐवजी ॲक्सिलेटरवर पाय दिला. त्यामुळे गाडी वेगाने पुढे गेली. या वेगवान गाडीने तीन रिक्षा, एक टेम्पो आणि दोन दुचाकीस्वारांना धडक दिली. दुपारी एक वाजेच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने मुंबईतील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत अपघातात जखमी झालेल्या आठ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ओला चालक राजू यादव हा घाटकोपरच्या कामराज परिसरातील रहिवासी आहे. तो सुधा पार्क परिसरातून गाडीने जात असताना अचानक त्याच्या वाहनाने वेग घेतला आणि समोर जी वाहने येतील, जी व्यक्ती येईल त्यांना उडवत तो हायवेच्या दिशेला निघून गेला होता. या चालकामुळे रस्त्याने शाळेत चालत जाणाऱ्या लहान मुलांनादेखील इजा पोहोचवली आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात रोष व्यक्त केला जात होता. पोलिसांनी संबंधित प्रकरणाची दखल घेवून ओला चालकाला ताब्यात घेतले आहे. घटनेचं गांभीर्य ओळखून स्वत: परिमंडळ पाचचे उपायुक्त प्रशांत कदम राजावाडी रुग्णालयात जाऊन पाहणी केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
Crime Ola Auto Driver Crushed 7 Peoples Accident
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/