India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

कोरोनामुळे प्रौढांमध्ये वाढला या गंभीर आजाराचा धोका; डॉ. मुकेश बत्रा यांची माहिती

India Darpan by India Darpan
September 22, 2022
in राज्य
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोव्हिडनंतरच्या जगामध्ये आणखी एका साथीचा धोका मूकपणे उदयाला येत आहे. हा धोका आजघडीला जाणवणारा आणि वास्तव आहे. वयोवृद्ध व्यक्तींमध्ये कोव्हिडच्या संसर्गामुळे अल्झायमर्सचा धोका लक्षणीयरित्या वाढत असल्याचे ताज्या संशोधनांमधून सूचित झाले आहे. जर्नल ऑफ अल्झायमर्स डिसिजमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार कोव्हिडची बाधा झालेल्या वयोवृद्ध व्यक्तींना वर्षभराच्या आत अल्झायमर्सचा आजार जडण्याचा धोका ५०-८०% अधिक आहे. ८५ वर्षे किंवा त्याहून वृद्ध स्त्रियांना या आजाराचा धोका अधिक असल्याचेही या अहवालात म्हटले गेले आहे.

या विषयावर आपले मत व्यक्त करताना पद्मश्री किताबाचे मानकरी, डॉ. बत्राज ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक आणि चेअरमन डॉ. मुकेश बत्रा म्हणाले, “अल्झायमर्स आजाराविषयी बहुतांश लोकांच्या मनात गैरसमज असल्याचे होमियोपॅथीच्या क्षेत्रातील माझ्या ५० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये मी पाहिले आहे. हा आजार प्राणघातक असू शकतो पण योग्य वेळी योग्य वैद्यकीय हस्तक्षेप झाल्यास रुग्ण अधिक सुरक्षित राहू शकतो. अल्झायमर्ससाठीचे होमियोपॅथी औषधोपचार हे प्रत्येक व्यक्तीच्या विशिष्ट गरजांनुसार केले जातात. हा एक सर्वांगीण दृष्टिकोन आहे, जो या आजाराच्या मूळ कारणावर उपचार करण्यास मदत करतो. संज्ञानात्मक आरोग्य टिकविण्यासाठी आणि एकूणच तब्येत चांगली राखण्यासाठी होमियोपॅथीखेरीज जीवनशैलीत केलेल्या काही आरोग्यकारक बदलांचीही मदत होऊ शकते.”

अल्झायमर्स ही एक अशी स्थिती आहे जी व्यक्तीच्या विचार करण्याच्या, वागण्याच्या आणि दैनंदिन कामे करण्याच्या क्षमतेवर परिणाम करते. भारतामध्ये ४० लाखांहून अधिक व्यक्तींना अल्झायमर्स असल्याची नोंद झाली आहे आणि जगभरात किमान ४.४ कोटी लोक या आजाराचा सामना करत आहेत. १९०६ साली या आजाराचा शोध लावणा-या डॉ. अलॉइस अल्झायमर्स यांचे नाव या आजाराला देण्यात आले आहे.

अल्झायमर्सची लक्षणे सुरुवातीला सौम्य असतात आणि कालपरत्वे ते अधिकाधिक तीव्र होत जातात. विस्मरण आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंसाठी योग्य शब्द आठवायला कष्ट पडणे या स्वरूपात या आजाराची पहिली लक्षणे दिसू लागतात. हा आजार फक्त वयोवृद्ध व्यक्तींनाच होतो असा गैरसमज सर्वत्र दिसून येतो, मात्र युवा-प्रौढ वयोगटातील व्यक्तींनाही हा आजार होऊ शकतो असे आकडेवारीतून दिसून येते. तज्ज्ञांच्या मते जनुकीय घटक, जीवनशैली आणि पर्यावरण अशा अनेक कारणांमुळे अल्झायमर्स होण्याची शक्यता असते.

After Covid Adults Facing Health Issues Disease
Dr Mukesh Batra Alzheimer 
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या  दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD


Previous Post

आयपीएलमध्ये होणार मोठा बदल; सौरव गांगुली यांची घोषणा

Next Post

मोबाइल चार्जिंगच्या नादात ७ जणांना चिरडले; ओला चालक अटकेत

Next Post

मोबाइल चार्जिंगच्या नादात ७ जणांना चिरडले; ओला चालक अटकेत

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्यगीत गायनाची नियमावली जाहीर; असे आहेत सरकारचे आदेश

February 2, 2023

FPO का मागे घेतला? गुंतवणूकदारांच्या पैशांचे काय? गौतम अदानी म्हणाले…. (व्हिडिओ)

February 2, 2023

महिलेच्या घरावर दगडफेक करुन वाहनाची तोडफोड करणा-या तीन जणांना पोलिसांनी केले गजाआड

February 2, 2023

बंदी घालण्यात आलेल्या विदेशी मांगूर माश्याचे घरातील हौदात उत्पादन; ३०० किलो मासे जप्त

February 2, 2023

पेट्रोल पंपावरील कामगाराने रोकड घेवून केला पोबारा; गुन्हा दाखल

February 2, 2023
प्रातिनिधिक फोटो

नाशकात गोल्फ क्लब मैदानावर मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचा विनयभंग

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group