सातपूर : सातपूर परिसरात घरातून क्रिकेट खेळण्यासाठी बाहेर गेलेल्या ११ वर्षीय मुलाचे अपहरण झाले आहे. अपहृत मुलाच्या वडिल शंभूशरण केदार शर्मा (रा. श्री दर्शन रो हाऊस, राधाकृष्ण नगर हिंदी शाळेजवळ) यांनी सातपुर पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, मुलगा निशांत उर्फ राजाबाबू शंभूशरण शर्मा (११) हा दोन दिवसांपूर्वी सायंकाळच्या सुमारास घराच्या बाहेर क्रिकेट खेळण्यासाठी बाहेर जात असल्याचे घरात सांगून गेला होता. यानंतर तो घरी परतला नाही. मुलगा घरी परत न आल्याने सर्वत्र चौकशी केली, मात्र कुणाकडे त्याबाबतची माहिती मिळाली नाही. पोलिसांनी मुलाचे अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाघ तपास करत आहेत.