नाशिक : पेठरोडवरील म्हसोबा बारीत भरधाव दुचाकी घसरल्याने रासेगाव ता.दिंडोरी येथील २९ वर्षीय चालकाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. दिपक कांतीलाल चारोस्कर असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. चारोस्कर १४ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास पेठरोडने आपल्या घराकडे दुचाकीवर (एमएच १५ एचटी ३२१६) जात असतांना हा अपघात झाला होता. म्हसोबा बारीत भरधाव दुचाकी घसरल्याने तो गंभीर जखमी झाला होता. कुटुंबियाने त्यास आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी हवालदार आसिफखान पठाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार प्रवास करीत असतांना स्व:ताच्या मरणास कारणीभूत झाल्याप्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक घोरपडे करीत आहेत.