गॅस गिझर वापरताय? आधी हे लक्षात घ्या
अंघोळीला गरम पाण्यासाठी आता घरोघरी गॅस गिझरचा वापर केला जातो. गॅस गिझर खर्चाच्या दृष्टीने देखील फायदेशीर आहे. गॅसवर पाणी तापवण्यापेक्षा गिझर वापरणं सोप्पं असलं तरीसुद्धा हा गिझर वापरताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. आपल्यापैकी अनेक जण गॅस गिझर चा वापर नक्कीच करत असतील.परंतु गॅस गिझर वापरताना कोणती काळजी घ्यावी याबाबत अनेक जणांना माहिती नसते. त्यातूनच अनेक दुर्घटना घडू शकतात.

9422273820 / 9860967270
ही काळजी घ्या
– गॅस गिझर खरेदी तसेच ऑनलाईन मार्फत खरेदी केल्यानंतर त्याची फिटिंग योग्य प्रशिक्षित टेक्निशियन व्यक्तींकडून योग्य ठिकाणी करून घ्यावी. जेणेकरून ते कसे वापरायचे याबाबत तुम्हाला व्यवस्थित माहिती देईल.
– गॅस पुरवठ्यासाठी फक्त रबरी पाइप न वापरता त्याला जास्त दिवस टिकणारी कायटेक पाईप फिटिंग करून घ्यावी.
– सर्वात महत्त्वाचं, वेळोवेळी गॅस गिझरचं चेकिंग करण्यात यावं. यामुळे गॅस गिझर मध्ये काही बिघाड असल्यास आपल्या लक्षात येईल आणि आपण अपघातापासून लांब राहू शकू.
– बाथरूममध्ये व्हेंटिलेशनसाठी ‘एक्झॉस्ट फॅन’ बसवून घेण्याची आवश्यकता आहे किंवा किमान खिडकी उघडी ठेवावी.
– गॅस गिझर वरील ऑन / ऑफ बटणाचा वापर अनेक जण करत नाही त्यामुळे प्रत्येकवेळी गिझर सुरू किंवा बंद करतांना बटणच वापरावे. थेट नळ बंद करू नये.
– आपल्यापैकी अनेकांना सवय असते की, जर गिझर सकाळी चालू केला तर सर्वांचं स्नान झाल्याशिवाय बंद केलं जात नाही. ही पद्धत अत्यंत चुकीची आहे.
– गिझर चालू असताना बादली भरेपर्यंत बाथरूमचा दरवाजा उघडा असावा, गिझर बंद केल्यानंतर दरवाजा लावून घ्यावा.
– शॉवर घ्यायचा असेल तर दरवाजा अर्धवट उघड ठेवावा. कारण घरातील व्यक्तींना कोण अंघोळीला गेले आहे याची माहिती असते. त्यामुळे दरवाजाला थोडीशी फट ठेवण्यास हरकत नाही.
– गिझरचे बॅटरी सेल दर सहा महिन्यांनी बदलले गेले पाहिजेत.
– दरवाजा लावून अर्धा-अर्धा तास शॉवर घेतल्यास बाथरूममधील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन जीव गुदमरला जाऊ शकतो.
– कारण दरवाजा लावल्याने अति गरम पाण्याने बाष्प तयार होते व श्वास कोंडला जाऊ शकतो.
वरील प्रकारे काळजी घेतल्यास होणाऱ्या दुर्घटना टाळता येऊ शकतात.