नाशिक – गहाळ झालेले २४ मोबाईल व बेवारस सापडलेल्या तीन सायकली मूळ मालकांना प्रजासत्ताक दिनी पंचवटी पोलिसांना परत केल्या आहे. एकूण दोन लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल परत मिळाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पंचवटी पोलिसांच्या या कामगिरीचे पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय, उपायुक्त अमोल तांबे, सहायक आयुक्त मधुकर गावीत यांनी कौतुक केले आहे. २४ मोबाईल आशुतोष पाटील, सुरज वैश्य, ज्ञानेश्वर पवार, सुनील महाजन, गोपीनाथ पवार, मयुर निकम, सूरज पेंढारकर, गोविंद गांगुर्डे, योगेश भोई, गोरक्षनाथ पालवे, जिग्नेश मोढ, गौरव जाधव, हर्षद गांगुर्डे, राजेंद्र अढांगळे, विष्णू चौधरी, प्रकाश बहिरम, सुजित बोटे, रामचंद्र पिंगळे, सूरज तुपसमुद्रे, रुपेश परदेशी, विक्रम शिंदे, पवन पगार, सिद्धार्थ नेटावणे, कंचन सोमासे यांचे सँमसंग, ओपो, विवो, रेडमी, एमआय आदी कंपन्यांचे मोबाईल परत देण्यात आले. तर तिघांच्या सायकलीही परत करण्यात आल्या.
पंचवटी पोलिस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, युवराज पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक निरीक्षक सत्यवान पवार, सहायक उपनिरीक्षक अशोक काकड, बाळनाथ ठाकरे, हवालदार सागर कुलकर्णी, अशोक गुंबाडे, कैलास शिंदे, दिपक नाईक, निलेश भोईर, राकेश शिंदे, गोरक्ष साबळे, नारायण गवळी, श्रीकांत कर्पे, अंबादास केदार, विलास चारोस्कर, मनोज खैरे, घनश्याम महाले, राहुल पालखेडे, योगेश सस्कर, राहुल लभडे, कल्पेश जाधव, कुणाल पचलोरे, राजेश राठोड, अविनाश थेटे, नितीन जगताप यांनी गेल्या आठ-दहा महिन्यात गहाळ झालेले मोबाईल तसेच बेवारस सापडलेल्या सायकलींचा शोध लावण्यात यश मिळवले.