इंडिया दर्पण ऑनलाईन वृत्तसेवा – सध्या विवाह समारंभाचा मोसम सुरू असून बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी लग्न बंधनात अडकत आहेत. चित्रपट सृष्टीतील अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या लग्नाबद्दल रसिकांना नेहमीच उत्सुकता असते. आज देखील गोव्यात एक शाही विवाह सोहळा संपन्न होत आहे. अभिनेत्री मौनी रॉय तिचा प्रियकर सूरज नांबियार हे लग्नबंधनात अडकत आहेत. लग्नाआधीचे कार्यक्रम सुरू झाले. हळदी समारंभही खास ठरला. त्याचे फोटो सोशल मिडियात व्हायरल झाले आहेत. आज सकाळपासून विवाह समारंभ सुरू झाले आहेत.
सूरज नांबियार आणि मौनी रॉयचे हळदीचे आणि मौनीचा मेहंदी सोहळा याचे फोटो सध्या सोशल मिडियात व्हायरल झाले आहेत. आज दोघेही सात फेरे घेणार आहेत. अर्जुन बिजलानी, मंदिरा बेदी यांच्यासह मौनी रॉयच्या अनेक जवळच्या मित्रांनी त्यांच्या लग्नाला हजेरी लावली आहे. लग्न समारंभाच्या फोटोंमध्ये दिसते आहे की, मौनी अतिशय प्रेमळ नजरेने सूरजकडे पाहत आहे. सूरजच्या चेहऱ्यावरही लग्नाचा आनंद आणि चमक स्पष्ट दिसत आहे. दोघांमधील प्रेम आणि रोमँटिक केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
टेलिव्हिजनच्या पडद्यावरील अभिनेत्री मौनी रॉय या व्यक्तिमत्त्वाशी प्रत्येक जण परिचित आहे, मात्र तिचा भावी पती सूरज नांबियारबद्दल फारच कमी माहिती आहे. या दोघांचे लग्न आज सायंकाळी गोव्यात मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. सूरज नांबियार यांचा जन्म कर्नाटकातील बंगळुरू येथे झाला. त्यांनी जैन इंटरनॅशनल रेसिडेन्शिअलमधून सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले. सूरज नांबियार यांनी २००८ मध्ये आरव्हीची सुरुवात केली. अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.
मौनी रॉयचा भावी पती सूरज नांबियार हा दुबईत राहणारा एक भारतीय व्यापारी आणि गुंतवणूक बँकर आहे. मौनीप्रमाणेच सूरज नांबियारही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. त्याच्या इन्स्टाग्रामवर पाहता सूरजलाही वाचनाची खूप आवड आहे. मौनी रॉय आणि सूरज यांची पहिली भेट दुबईमध्ये झाली. त्यानंतर ते मित्र झाले आणि एकमेकांना डेट करू लागले. पण या दोघांनी कधीही त्यांच्या नात्याची अधिकृत पुष्टी केली नाही किंवा त्यांच्या नात्याबद्दल कोणालाच माहिती दिली नाही. मात्र, दोघेही अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले. अभिनेत्री मौनी रॉयसाठी आजचा दिवस खूप खास आणि संस्मरणीय असणार आहे. मौनी रॉय आज बॉयफ्रेंडसोबत लग्न करून तिच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करणार आहे. मात्र लग्नापूर्वीच्या लग्नाच्या फंक्शनमधून मौनीने सूरजसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे, ज्याची सर्वत्र चर्चा आहे.
https://twitter.com/MouniRoy143/status/1486564552296656900?s=20
विवाह सोहळ्याच्या फोटोमध्ये मौनी लाल रंगाचा सूट परिधान केलेल्या सूरज नांबियारच्या हातात दिसत आहे. मौनी अतिशय प्रेमळ नजरेने सूरजकडे पाहत आहे. दोघांमधील प्रेम आणि रोमँटिक केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. मौनीला तिच्या आयुष्याच्या नव्या सुरुवातीसाठी चाहते खूप शुभेच्छा देत आहेत. मौनीचा जोडीदार सूरज पांढऱ्या कुर्ता पायजमामध्ये खूपच सुंदर दिसत आहे. फोटोत दोघांची जोडी पाहून प्रत्येक जण त्यांना अशीच आनंदी राहो अशी प्रार्थना करत आहे. मौनी तिच्या हळदी फंक्शनमध्ये बॉयफ्रेंड सूरजसोबत डान्स करताना दिसली होती. पिवळा लेहेंगा आणि चोलीमध्ये मौनीचा लूक खूपच ग्लॅमरस दिसत होता.
गोव्यात मौनी रॉयचा हळदी सोहळा आयोजित करण्यात आला असून त्यात काही खास मित्रांनीच सहभाग घेतला आहे. हळद लावल्यानंतर मौनी रॉय भावूक झाली आणि तिने सूरजला मिठी मारली. मौनी रॉय आणि सूरज नांबियारचा हा फोटो पाहून चाहते चर्चा करत आहेत. मौनी रॉयचा खास मित्र आणि सुप्रसिद्ध टीव्ही कलाकार अर्जुन बिजलानीही या सोहळ्यात दिसला. अर्जुन बिजलानीनेही मौनी रॉयसोबत खूप धमाल केली आहे. या फोटोमध्ये मौनी आणि अर्जुन मस्तीपूर्ण स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहेत. हळदीनंतर लगेचच मौनीचा मेहंदी सेरेमनीही सुरू झाला आहे.