नाशिक : उड्डाणपुलावर भरधाव कार राखेने भरलेल्या मालवाहू डंपरवर पाठीमागून आदळल्याने मोठा अपघात झाला. यात कारचालक राज निकम जागीच ठार झाले.काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. राज दादाजी निकम (रा. अयोध्यानगरी, अमृतधाम) हा त्याच्या ताब्यातील टाटा इंडिका कार घेऊन द्वारका बाजूकडून पाथर्डी फाट्याच्या दिशेने उड्डाणुलावरून जात असतांना हा अपघात झाला. मुंबई-आग्रा हायवेवरील हॉटेल मामा का ढाब्याजवळून एमएच १५ जीव्ही ९३५४ या क्रमांकाचा मालवाहू डंपर राख भरून घेऊन जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या कारने डंपरला पाठीमागून धडक दिली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मयत निकम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.