नाशिक : देवदर्शनासाठी इगतपुरी येथून आलेल्या पांडू सखाराम घाटेसाव यांना रिक्षाचालकासह त्याच्या साथीदाराने बेदम मारहाण करुन त्यांची लुट केल्याची घटना तपोवनात घडली आहे. यावेळी भामट्यांनी घाटेसाव यांचा मोबाईल आणि ५०० हजाराची रोकड,आधारकार्ड असा सुमारे साडे पाच हजाराचा ऐवज बळजबरीने काढून घेत पोबारा केला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांडू सखाराम घाटेसाव (७२ रा.पाडळी देशमुख ता. इगतपुरी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. घाटेसाव सोमवारी ते देवदर्शनासाठी शहरात आले होते. तपोवनातील लक्ष्मी नारायण मंदिर येथून ते दर्शन घेवून कपीला संगमच्या दिशेने रिक्षातून (एमएच १५- ५३३९) प्रवास करीत असतांना रिक्षाचालकासह त्याच्या साथीदाराने कपीला संगमकडे जाणा-या कच्या रोडवर घेवून जात त्यांना शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली.