नाशिक – लेखानगर भागातील इंदिरा गांधी वसाहतीत राहणा-या सात वर्षीय चिमुरडीचा मृत्यु झाला. घरात बेशुध्द अवस्थेत मिळून आलेल्या बालिकेस जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता तिला मृत घोषीत करण्यात आले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सृष्टी राहूल वाघमारे (वय ७) असे मृत चिमुरडीचे नाव आहे. शनिवारी (दि.२५) दुपारच्या सुमारास ती आपल्या घरात बेशुध्द अवस्थेत मिळून आली होती. कुटूबियांनी तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.