नाशिक – देवळाली कॅम्पला नागझीरा नाल्यालगत चंद्रमणीनगर परिसरात युवकाकडून तलवार हस्तगत करण्यात आली आहे. आरबाज मनान अली (वय २०, स्टेशनवाडी ) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे बुधवारी (दि.२२) सकाळी दहाच्या सुमारास त्याच्याकडे स्टीलच्या म्यानात स्टीलच्या पत्र्याचे कव्हर असलेली ३२ इंच लांबीची धारदार तलवार सापडली. याप्रकरणी पोलीस हवालदार गुलाब प्रभाकर सोनार यांच्या तक्रारीवरुन देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.