नाशिक – वृद्ध महिला एकट्या घरात असतांना तीन ते चार चोरटे घरात घुसले. त्यांनी या महिलेच्या गळ्याला चाकू लावत घरातील हिऱ्याच्या अंगठ्या चोरल्या. तसेच त्यांच्या कोऱ्या चेक वर सह्या घेऊन चोरटे फरार झाले. शहराच्या उच्चभ्रू वस्ती असलेल्या होलाराम कॉलनीत संचेती टॉवर्स मधील फ्लॅटमध्ये ही घटना घडली. पद्मा केला ही वृध्द महिला एकटी असतांना हा प्रकार घडला आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे, पो. उ. नि. कोल्हे यांनी घटनास्थळी भेट दिली असून गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे. या घटने मुळे शहरातील कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.