गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक : विहीतगाव परिसरात बंद घर फोडून चोरट्यांनी सव्वा लाखाच्या ऐवजावर डल्ला

by India Darpan
डिसेंबर 1, 2021 | 2:34 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


नाशिक : विहीतगाव परिसरात बंद घर फोडून चोरट्यांनी सव्वा लाखाच्या ऐवजावर डल्ला
नाशिक : विहीतगाव परिसरात बंद घर फोडून चोरट्यांनी सव्वा लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला.त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेखा विजय परदेशी (रा.रसिक लक्ष्मी सोसा.लोटस हॉटेल समोर,विहीतगाव) यानी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. परदेशी कुटूंबिय गेल्या शुक्रवारी (दि.२६) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील १ लाख ६ हजार रूपयांची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख २१ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक बटूळे करीत आहेत.

दोन मोटारसायकल चोरी
नाशिक : शहरातून दिवसाआड चार पाच मोटारसायकलींवर चोरटे डल्ला मारत असून नुकत्याच दोन दुचाकी चोरट्यानी पळवून नेल्या. याप्रकरणी आडगाव आणि मुंबईनाका पोलीस ठाण्यात वाहनचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हिरावाडीतील देवेंद्र नंदू गवळी (रा.सुर्यानंद सोसा.शक्तीनगर) हे गेल्या शनिवारी (दि.२७) नवीन आडगावनाका भागात गेले होते. स्वामीनारायण नगर येथील पाटणकर फेब्रीकेशन समोर पार्क केलेली त्यांची पल्सर एमएच १५ एफएक्स ०४४० चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक जाधव करीत आहेत. दुसरी घटना मदिना चौकात घडली. याप्रकरणी शहबाज सफीउल्ला देशमुख (रा.हुमा सोसा.मदीनाचौक) यांनी तक्रार दाखल केली आहे. देशमुख यांची दुचाकी एमएच १५ डीव्ही ७७१६ गेल्या रविवारी (दि.२८) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार टेमगर करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – भरधाव कार आणि अ‍ॅटोरिक्षात झालेल्या धडकेत रिक्षाप्रवासी ठार

Next Post

ओमिक्रोन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विमानतळांवर आणखी कडक निर्बंध

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

ओमिक्रोन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विमानतळांवर आणखी कडक निर्बंध

ताज्या बातम्या

bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011