नाशिक – २४ वर्षीय तरुणाने अंबड परिसरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. प्रथमेश प्रकाश बोरसे (२४) या असे आत्महत्या करणा-या तरुणाचे नाव आहे. परिसरातील एका इमारतीत तो सहाव्या मजल्यावर राहत होता. प्रथमेशने पंख्याच्या हुकाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. सणाच्या काळात ही आत्महत्येची घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अंबड ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.