सासऱ्याला जावयाकडून मारहाण
नाशिक – नातवाला जावयाच्या भेटीला घेऊन आलेल्या सासऱ्याला जावयाने मारहाण केल्याचा प्रकार रेणुकानगर परिसरात उघडकीस आला. याप्रकरणी रघुनाथ नारायण घरटे (वय ६०, दाभाडी मालेगाव ) यांच्या तक्रारीनुसार, योगेश सुभाष झगडे (वय ४५, रेणुकानगर वडाळा नाका) यांच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी (ता.९) सकाळी दहाला फिर्यादी रघुनाथ घरटे हे पत्नी व मुलीसह त्यांचा नातू व योगेश झगडे यांच्या मुलगा हर्ष (वय ६) याला घेऊन आरोपी योगेशच्या भेटीसाठी घेऊन आले होते. जावई आणि नातवाच्या भेटी दरम्यान त्यांच्या पत्नीने जावई योगेश यांना मुलगी श्रध्दाला नांदवायला ठेऊन घ्या किंवा फारकत द्या असे सांगितल्याचा राग आल्याने जावई योगेश याने पत्नी, मुलगी यांना मारहाण केली. याप्रकरणी जावई योगेश याला अटक करण्यात आली आहे.
…
हरवलेला टॅब देण्याच्या बहाण्याने मारहाण
नाशिक – गोदावरी नदीकाठी रोकडोबा तालीमीसमोर रात्री साडे नऊच्या सुमारास पाच सहा जणांनी एकाला बेदम मारहाण करीत, दुचाकीवर दगड टाकून नुकसान केले. याप्रकरणी जयेश चंद्रकुमार वाघ (वय २७, नेहरुनगर जळगाव) याच्या तक्रारीवरुन अक्षय महाले, बंटी दोंदे मुंबई नाका यांच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जयेश वाघ यांच्या तक्रारीनुसार, अक्षय महाले याने फोन करुन त्याचा हरवलेला सॅमसग टॅब वैष्णवी देवरे हिच्याकडे घेऊन देतो. असे सांगून त्याला जळगावहून बोलावून घेतले. त्यानंतर शुक्रवारी (ता.९) रात्री साडे नऊच्या सुमारास त्याचा मित्र बंटी देवरे व इतर पाच सहा जणांनी संगनमताने जयेश वाघ, सचिन काकणे, मयुर दामोदर आदीना शिवीगाळ करीत, लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच त्यांच्या दोन मोटार सायकलवर मोठ मोठे दगड टाकून नुकसान केले.
…
कट मारल्याने दुचाकीस्वार गंभीर
नाशिक – रविवार कारंजा चौकातील एक्सीस बॅकेच्या एटीएमसमोर दुचाकीस्वाराने कट मारल्याने मोपेडवरील दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. जयेश सुभाष जुन्नरे (वय २३, मल्हार गेट, पोलीस चौकीमागे रविवार पेठ ) हा दुचाकी स्वार तोल जाऊन पडल्याने गंभीर जखमी झाला. याप्रकरणी स्वप्नील कैलास कटवटे (वय ३६, अदिनाथ चेंबर्स, मिरा दातार दर्ग्यासमोर पंचवटी) यांच्या तक्रारीवरुन सरकारवाडा पोलिसात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. स्वप्नील याच्या तक्रारीनुसार, २७ जूनला रात्री आठच्या सुमारास तो त्याचा मामे भाउ जयेश जुन्नरे (वय २३, मल्हार गेट पोलीस चौकीमागे रविवार पेठ) याच्यासोबत सुझुकी ॲक्सेस मोपेड (एमएच १५ एचएफ ३७५९) हिच्यावरुन जात असतांना रविवार कारंजा चौकातील ॲक्सीस बॅकेच्या एटीएम समोरुन भरधाव आलेल्या अज्ञात वाहन चालकाच्या प्रखर विजेच्या उजेडाने अचानक गाडीचा तोल जाउन पडल्याने त्यात, जयेश जुन्नरे (वय २३) हा गंभीर जखमी झाला.