बटुक हनुमानाचे दागिणे चोरीला
नाशिक – तपोवनात बटुक हनुमान मंदीरात शुक्रवारी मुर्तीचे दागिणे चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महंत बालकदास शामसुंदर त्यागी (वय ३२, हनुमान बटुक मंदीर) यांच्या तक्रारीनुसार शुक्रवारी (ता.९) दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास तपोवनातील बटुक हनुमान मंदीरात दर्शनासाठी आलेल्या अज्ञात महिलेने मंदीरातील देव्हाऱ्यात ठेवलेल्या शालीग्राम शिलामूर्तीच्या गळ्यातील ५ ग्रॅम सोन्याची चेन, त्यात बालाजीचे पान, ४५० ग्रॅमचे चांदीचे सिंहासन असा सुमारे २५ हजाराचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
…..