नाशिक : महिला कंडक्टरवर एकाने सलग तीन वर्ष बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहाचे आमिष दाखवून १ जानेवारी २०१९ ते २० मे २०२२ दरम्यान संशयिताने पीडितेचे सिडकोतील घर गाठून वेळोवेळी बलात्कार केला आहे. पीडितेने लग्नाचा तगादा लावला असता संशयिताने तिला शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी देत लग्नास नकार दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे. रमेश कांतीलाल कामडी (३२ रा.करंजाळी ता.पेठ) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी एस.टी.महामंडळातील ३२ वर्षीय पीडित महिला वाहकाने तक्रार दाखल केली. मुळची दिंडोरी येथील पीडिता घटस्फोटीत असून ती सिडको भागात राहते. मैत्रीणीच्या माध्यमातून पीडितेची पेठ येथील सायबर कॅफे चालक असलेल्या संशयिताशी ओळख झाली होती. मैत्रीणीचा नातेवाईक असल्याने दोघांमध्ये मैत्री जमली. या काळात संशयिताने लग्नाचे आमिष दाखविल्याने दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.