नाशिक – कार व दुचाकीच्या अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वार महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू
नाशिक – पाथर्डीफाटा जवळ कार व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला आहे. अक्षदा दत्तू धुमाळ (२६, रा. हनुमानवाडी, पंचवटी) असे या महिलेचे नाव आहे. अक्षदा या १६ मे रोजी दुचाकीवरून पाथर्डीफाटा मार्गे पाथर्डीगावाच्या दिशेने जात होत्या. मात्र एका वळणावर कारवर दुचाकी आदळल्याने अक्षदा जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
२२ वर्षीय युवतीची आत्महत्या
नााशिक – २२ वर्षीय युवतीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना प्रमोद महाजन उद्यानाजवळील ओम शुभम अपार्टमेंट येथे घडली. प्रियंका सुरेश खैरनार (२२) असे या तरुणीचे नाव आहे. प्रियंकाने शनिवारी सकाळी गळफास घेतल्याचे समोर आले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.