नाशिक – दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यास मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करुन तीन दुचाकी हस्तगत केल्या आहे. पोलीस हवालदार शेरु पठाण यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन सापळा रचण्यात आला. त्यात संशयित साहिल रफीक शहा ( वय १९ वर्ष, रा म्हाडा वसाहत, वडालागाव, नाशिक) अडकला. हा आरोपी मुंबईनाका पोलिस ठाणाच्या हद्दीत चोरी केलेली बजाज डिस्कव्हर मोटर सायकल नबर एमएच १५ -ईएन ७२८० ही विक्री करणे करीता डोंगरे वास्तिगृह गंगापुर रोड येथे रोडलगत येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला पकडण्यात आले. एसआय सुनिल माळी, पोलिस हवालदार शेरखान पठान,किशोर देसले, सुहास क्षीरसागर, सुनिल भालेराव, समीर चंद्रमोरे, गणेश वाघ आदीच्या पथकाने हा सापळा लावला. या संशयिताकडून तीन दुचाकी यात बजाज डिस्कव्ह, दोन हिरोहोण्डा स्पलेंडर दुचाकी अशा एकूण ७५ हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी हस्तगत करून चोरीचे गुन्हे उघड़किस आणले.