नाशिक – तीन मजली जुन्या इमारतीतून ९ लाख ८१ हजार रुपयाचा ऐवज चोरीला

नाशिक –  भद्रकाली हद्दीतील पोलीस  स्टेशन  नावदरवाजा  येथील तीन मजली, जुन्या इमारतीत काल सकाळी १०.३० ते आज  दिनांक १० जुनचे रात्री  कोणीतरी अज्ञात चोरट्याने आत  प्रवेश  करूनचे सोने चांदीचे  दागिने असा एकूण. ९ लाख ८१ हजार रुपयाचा  ऐवज  चोरून नेला असल्याचे वृत्त आहे. यातील मूळ मालक औरंगाबादकर योग टीचर असून ते रत्नागिरीला आहे. त्यामुळे या चोरीची तक्रार त्यांचा भाचा मंदार वडनेरकर यांनी दिली.मंदार याच्या तक्रारीवरुन या चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भद्रकाली पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे तसेच साहाय्यक पोलिस आयुक्त श्रीमती दिपाली खन्ना यांनी घटनास्थळी भेट दिली.
गेल्या काही दिवसात झालेली ही मोठी घरफोडी असून त्यादिशेने पोलिस आता तपास करत आहे. कोणीतरी पाळत ठेऊन ही घरफोडी केली असल्याचे बोलले जात आहे.