इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाल्याने सध्या अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. तरी अद्याप आपल्या देशात प्रचंड गरिबी असून कोट्यावधी नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अनेक झोपडपट्ट्यांमध्ये सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था नसल्याने त्यांना उघड्यावर जावे लागते. इतकेच नव्हे तर काहीजण जीवाची पर्वा न करता रेल्वे रुळावर शौचास बसतात. हरियाणामध्ये एका ठिकाणी अशी एक अल्पवयीन मुलगी रेल्वे रुळानजिक शौचासाठी केली असता तिच्यावर सामूहिक तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिची हत्या झाली आहे.
फरिदाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून नंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना उजेडात आली आहे. 12 वर्षांची पीडित मुलगी रेल्वे लाईनजवळ शौचास गेली होती. त्याचदरम्यान ही घटना घडली. घरामध्ये शौचालय नसल्यामुळे माझ्या बहिणीला बाहेर शौचास जावे लागले. जर आमच्या घरामध्ये टॉयलेटची व्यवस्था असती, तर माझ्या बहिणीला प्राण गमवावा लागला नसता तसेच तिच्यावर अत्याचाराचीही घटना घडली नसती, अशी प्रतिक्रिया पीडितेच्या बहिणीने दिली आहे.
रेल्वे रुळाजवळील झुडपात पीडित मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळला. या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. घटनेनंतर नराधम फरार झाले असून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध खून, पॉक्सो कायदा तसेच इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी ही बिहारच्या आराह जिल्ह्यातील रहिवासी होती. ती सध्या फरिदाबादमधील आझाद नगर झोपडपट्टीत आईसोबत राहत होती. तीन महिन्यांपूर्वी आजारपणामुळे तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांच्या पश्चात मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्यांची आई एका खासगी कंपनीत काम करायची. 11 ऑगस्ट रोजी सकाळी रक्षाबंधनाच्या सणानिमित्त पीडित मुलीची आई भावाला भेटण्यासाठी दिल्लीला गेली होती. त्याचदरम्यान पीडित मुलगी शौचास बाहेर गेली असता तिच्यावर अत्याचार व नंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली.
पीडित मुलीच्या आईने मुलीच्या बाबतीत घडलेल्या प्रकाराबद्दल दुःख व्यक्त करीत घटनाक्रम कथन केला आहे. आमच्या झोपडपट्टीत शेतात शौच करण्यासाठी गेली होती. झोपडपट्टीत शौचालये नाहीत. त्यामुळे नागरिक शौच करण्यासाठी रुळावर जातात. मुलीसोबत तिची बहीण आणि एक मैत्रिण होती. ते खूप वेळ माझ्या मुलीची वाट पाहत होते. पण ती माघारी आली नाही. अखेर तासाभरानंतर मुलीचा मृतदेह रुळाजवळील झुडपात आढळून आला. ती बेशुद्ध अवस्थेत पडली होती. तिच्या शरीरातून प्रचंड रक्तस्त्राव झाला होता. मुलीच्या बाबतीत घडलेला हा सर्व प्रकार अत्यंत भयंकर आहे. याबाबतीत आम्हाला न्याय हवा आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. माझ्या मुलीच्या बाबतीत जे भयंकर घडले आहे, अशी वेळ कुणा दुश्मनावरही येऊ नये, अशी भावना पीडितेच्या आईने व्यक्त केली आहे.
पीडित मुलीवर बलात्कार झाला व नंतर तिचा गुदमरून मृत्यू झाल्याचे पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आले आहे. आरोपीने मुलीला बळजबरीने उचलून झुडपात निर्जन ठिकाणी नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिने प्रतिकार केल्यावर तिचा गळा दाबून खून केला, असा संशय घटनेचा तपास करणाऱ्या रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी रेल्वे रुळाजवळ राहणाऱ्या किमान 50 नागरिकांची चौकशी केली आहे, मात्र आरोपीची ओळख अद्याप पटलेली नाही. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे. त्या फुटेजमध्ये दोन व्यक्ती झुडपाकडे जाताना दिसत आहेत. त्याआधारे पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Crime Minor Girl Rape Murder Toilet Police