शनिवार, मे 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अजानच्या भोंग्यांबाबत उच्च न्यायालयाने दिला हा महत्त्वाचा निकाल

by India Darpan
ऑगस्ट 25, 2022 | 5:15 am
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मशिदींवरील लाऊडस्पीकरवर अजान देण्यावरून काही महिन्यांपूर्वी देशभरात वाद निर्माण झाला होता. अनेकांनी अजानवर आक्षेप घेतला. त्यामुळे राजकीय क्षेत्रातही मोठे पडसाद उमटले होते. आता कर्नाटक उच्च न्यायालयाने मशिदींवरील लाऊडस्पीकरवर अजान देण्याच्या मुद्द्यावर महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मशिदींवरील लाऊडस्पीकरवर अजान दिल्यामुळे इतर धर्मांतील नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होत नाही, असे मत कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी व्यक्त केले आहे.

लाऊडस्पीकरवर अजानसंदर्भात उच्च न्यायालयात एका जनहित याचिका दाखल झाली आहे. अजान ही मुस्लिमांची अत्यावश्यक धार्मिक प्रथा आहे. मात्र, अजानच्या आवाजाचा इतर धर्माचे पालन करणाऱ्यांना त्रास होतो, असा दावा करीत बंगळुरू येथील रहिवासी मंजुनाथ एस. हलावर यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर मंगळवारी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली. कर्नाटक उच्च न्यायालयाने मशिदींना लाऊडस्पीकरवर अजान देण्यास बंदी घालण्यालाही नकार दिला आहे. राज्यघटनेच्या कलम २५ (१)नुसार सर्व नागरिकांना त्यांचा धर्म स्वीकारण्याचा आणि धर्माचा प्रचार करण्याचा मूलभूत अधिकार आहे, असे उच्च न्यायालयाने मंगळवारच्या सुनावणीदरम्यान नमूद केले.

ध्वनी प्रदूषण नियम लागू करा!
अजान देण्यास कोणताही विरोध नसला तरी मशिदींना लाऊडस्पीकरशी संबंधित ध्वनी प्रदूषण नियम लागू करा तसेच त्या नियमांचे मशिदींकडून कशाप्रकारे पालन केले जात आहे का याचा अहवाल सादर करा, असे निर्देशही कर्नाटक उच्च न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यघटनेच्या कलम २५ आणि २६ मध्ये सहिष्णुतेच्या तत्त्वाला मूर्त रूप देण्यात आले आहे. हे तर भारतीय सभ्यतेचे वैशिष्ट्य आहे.

राज्यघटनेचे कलम २५(१) लोकांना त्यांच्या धर्माचा मुक्तपणे प्रचार आणि प्रसार करण्याचा मूलभूत अधिकार प्रदान देते. राज्यघटनेच्या कलम २५(१) मध्ये सर्व नागरिकांना त्यांचा धर्म स्वीकारण्याचा आणि प्रचार करण्याचा मूलभूत अधिकार आहे. मात्र हा पूर्ण अधिकार नसून, सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्याच्या बाबतीत राज्यघटनेच्या भाग तीनच्या इतर तरतुदींनुसार निर्बंधांचे पालन गरजेचे आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Karnataka High Court Order About Masjid Loudspeaker

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

घराबाहेर शौचास गेलेल्या अल्पवयीन बालिकेवर बलात्कार करुन तिची हत्या

Next Post

जन्माष्टमी विशेष लेखमाला – भगवान श्रीकृष्णाने येथे केला देहत्याग

Next Post
FagSh SUcAEUciF e1661339564795

जन्माष्टमी विशेष लेखमाला - भगवान श्रीकृष्णाने येथे केला देहत्याग

ताज्या बातम्या

bjp11

आक्षेपार्ह, द्वेषपूर्ण ट्वीट…भाजपच्या या आमदारांविरुध्द काँग्रेसची तक्रार दाखल

मे 24, 2025
Untitled 46

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर…

मे 24, 2025
Election 4 1140x571 1

केंद्रीय निवडणूक आयोग मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार

मे 24, 2025
NMC Nashik 1

दिवाबत्तीच्या खांबात असतो ४४० व्होल्टचा वीजपुरवठा…नाशिक महानगरपालिकेने दिला हा इशारा

मे 24, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत ३५ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित…

मे 24, 2025
bhujbal 11

अखेर मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे या खात्याची जबाबदारी…

मे 24, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011