इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सोशल मिडियाच्या वापराचा आणि महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना वारंवार समोर येत असतात. आताही उत्तर प्रदेशात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बदायूंमधील फैजगंज बेहता भागात रात्री उशिरा एक तरुण इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहत होता. त्याचवेळी त्यांची नजर एका व्हिडीओवर पडली ज्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तो व्हिडिओ बहिणीवर झालेल्या बलात्काराचा होता. हा गैरप्रकार त्याने आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर मुलीला विचारणा केली असता तिने संपूर्ण घटना सांगितली.
एका व्यक्तीने या मुलीवर बलात्कार केल्याचे त्याने सांगितले. त्याच्या पत्नीने त्याचा व्हिडिओ बनवून इन्स्टाग्रामवर टाकला. पोलीसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय तरुणीला एका महिलेने घरी बोलावले, त्यानंतर ती तरुणी हीटरवर रोटी करत असताना, मोबाईल दाखवण्याच्या बहाण्याने सदर महिलेने तिला तिच्या खोलीत नेले.
तिथे त्या महिलेने तिला कॉटवर बांधून ठेवल्याचा टाकल्याचा आरोप आहे. इतक्यात तिचा नवरा आला. त्याने तरुणीवर बलात्कार केला आणि ती महिला त्याचा व्हिडिओ बनवत राहिली. यानंतर ती तरूणी घरी गेली, मात्र तिने घाबरून घरच्यांना काहीही सांगितले नाही. दरम्यान तिच्या भावाने हा व्हिडीओ पाहिला. पोलिसांच्या चौकशीत आरोपी महिलेने हा व्हिडीओ बनवल्याची कबुली दिली आहे.
तिच्या पतीने मुलीवर अनेकवेळा बलात्कार केला पण तो मान्य करत नव्हता. त्यात सुधारणा करण्यासाठी तिने हा एक व्हिडिओ बनवला पण फसवणूक करून तो इंस्टाग्रामवर व्हायरल झाला. त्यामुळे ही महिला स्वत: या कृत्यात अडकली, आरोपी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तत्काळ छापा टाकून आरोपी दाम्पत्याला अटक केली. आता दोघांचीही कारागृहात रवानगी करण्यात आली.
Crime Instagram Brother Sister Rape Video Uttar Pradesh Budaun