इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पती-पत्नीचे भांडण सर्वश्रूत असले तरी उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पती आणि पत्नीमध्ये वाद झाला. त्याचे पर्यवसन कडाक्याच्या भांडणात झाले. त्यानंतर रागावलेल्या पत्नीने थेट पतीची जीभ दाताने चावली. हा चावा इतका जबर होता की पतीच्या जिभेचा थेट तुकडाच पडला. त्यानंतर तातडीने पतीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
ठाकूरगंजचे निरीक्षक विकास राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकूरगंजच्या राधाग्राम परिसरात पती-पत्नीमध्ये भांडण झाले. भांडणाच्या वेळी पत्नीने पतीची जीभ दाताने चावली. जीभ खाली पडली. जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव सलमा असून ती राधाग्राम कॉलनी येथील रहिवासी आहे. जखमी पतीचे नाव मुन्ना आहे. तीन वर्षांपूर्वी तिचा टाकिया येथे राहणाऱ्या मुन्नासोबत वाद झाला होता. मुन्ना हा मजूर म्हणून काम करतो. वर्षभरापासून दोघांमध्ये वाद सुरू असून ते वेगळे राहत आहेत. त्यांची दोन मुले मुन्नाच्या घरी राहतात. सलमा आणि मुन्ना गुरुवारी मुलांना भेटायला गेले.
दरम्यान दोघांमध्ये वाद झाला. वाद सुरू असताना हाणामारी सुरू झाली. सलमाने मुन्नाची जीभ कापली. आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावले. त्यांनी मध्यस्थी करून दोघांना वेगळे केले. जखमी मुन्नाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सलमाविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.
Crime Husband Wife Fight Tongue Cut by Teeth