इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शिक्षक आणि विद्यार्थी म्हणजेच गुरू-शिष्याचे नाते या अत्यंत पवित्र मानले जाते. आजच्या काळात विद्यार्थ्यांना कोणती शिक्षण देताना कुठल्या प्रकारची मारहाण करू नये, असे म्हटले जाते. तरीही आपल्या देशात काही राज्यांमध्ये शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मारहाणीच्या घटना घडतातच. अशाच प्रकारची घटना उत्तर प्रदेशात घडली.
बागपतच्या बरका गावातील माध्यमिक शाळेत एका सहावीच्या विद्यार्थ्याने कार साफ करण्यास नकार दिल्याने मुख्याध्यापकाने या विद्यार्थ्याला क्रूरपणे मारहाण केली. इतकेच नव्हे तर विद्यार्थ्याला पेनने हातवर जखमा करण्याबरोबरच शाळेच्या एका डेस्कवर डोक्यात मारले आणि शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
घटनेची माहिती मिळताच पीडित विद्यार्थ्याचे नातेवाईक आणि हिंदू जागरण मंचच्या अधिकाऱ्यांनी पोलीस ठाणे गाठत गोंधळ घातला. यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्याला आरोग्य तपासणीसाठी आरोग्य केंद्रामध्ये पाठवले आहे. तसेच शालेय व्यवस्थापनाने आरोपी मुख्याध्यापकला निलंबित केले.
पूर्व माध्यमिक शाळेत सहाव्या वर्गात राकेश हा गावातील एका गरीब कुटुंबाचा मुलगा शिकतो. शाळेच्या मुख्याध्यापकाने या विद्यार्थ्याला गाडी साफ करण्यास सांगितल्याचा आरोप आहे. काही वेळ कार साफ केल्यानंतर त्याने संपूर्ण गाडी पुढे साफ करण्यास नकार दिल्याने मुख्याध्यापक संतापले.
मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याच्या डोक्यावर, हातावर आणि कपाळावर पेनने गोंदवण्यास सुरुवात केली आणि डेस्कवरही डोके आपटले, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. कसा तरी हा विद्यार्थी शाळेतून घरी पळून गेला. यानंतर कुटुंबीय विद्यार्थ्यासह पोलीस ठाण्यात येथे पोहोचले. येथे हिंदू जागरण मंच आणि अभाविपच्या पदाधिकाऱ्यांसह गोंधळ झाला. पोलीस ठाण्याचे प्रभारी मगनवीर सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल.
माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हारुण अली मुनव्वर म्हणाले, ‘ हा सहावीचा विद्यार्थी असून तो शाळेत दंगा करतो. त्याने अभ्यासाला नकार दिल्याने तो कुटुंबीयांसह शाळेत आला आणि मला मारहाण केली. याप्रकरणी फिर्याद दिली असून माझ्यावरील सर्व आरोप निराधार आहेत.