इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेशात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेयसीने प्रियकाराला विष पाजले. त्यानंतर त्याला फोन केला आणि त्याच्याशी संवाद साधला. याप्रकरणात प्रियकराचा मृत्यू झाला आहे. हा सर्व प्रकार आता पोलिसांच्या तपासात उघड झाला आहे.
आग्रा परिसरातील एटा येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. हातरस येथील अंकित पुंढिर या तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्याच्या तपासात पोलिसांना तीन कॉल रेकॉर्डिंग समोर आले आहेत. विष पाजल्यानंतर प्रेयसीने अंकितला फोन केला. अंकितचा मृत्यू झाला आहे की नाही हे तिला जाणून घ्यायचे होते. रेकॉर्डींगमध्ये स्पष्ट होते आहे की, अंकितचा दीर्घ श्वास घेऊन संवाद झाला. प्रेयसी म्हणाली की, एवढ्यानंतरही वाचलास तर फाशी घे… गुडबाय.
17 मार्च रोजी ही घटना डंडेश्री गावात ही घटना घडली होती. त्यात अंकित पुंढीर (वय 22) याचा मृत्यू झाला. त्याची मैत्रीण व प्रेयसी चित्रा हिने अंकितला हरियाणातून फोन केला होता. यामध्ये दोघांचे कॉल रेकॉर्डिंग समोर आले आहे. एका कॉलच्या संभाषणानुसार अंकितला विष देण्यात आले आणि तो शेवटचे श्वास घेत होता. त्यानंतर चित्राने फोन केला.
कॉल रिसिव्ह केल्यानंतर, अंकित दीर्घ श्वास घेत होता. हॅलो-हॅलो, बोलो असे तो म्हणाला. खूप वेळाने चित्रा म्हणाली… आता काहीच झाले नाही तर फाशी घे, गुडबाय. अंकित म्हणतो ठीक आहे, तुला आणखी काही खायला घालायचे असेल तर तेही खायला दे. तेव्हा चित्रा म्हणते असेच मरून जा.
दुसर्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये चित्रा ही अंकितला येण्यास भाग पाडते. त्यानंतर अंकित १६ मार्चला येण्याचे सांगतो. असे अनेक शब्द त्यात बोलले गेले आहेत, यावरून हे सिद्ध होते की चित्रा हिने खुनाची संपूर्ण योजना आधीच बनवली होती. यामध्ये चित्रा सांगते की, छाती ठोकून ये. अंकित समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा चित्रा गोष्टी फिरवते. त्याला फोन करण्यासाठी संध्याकाळची वेळ दिली जाते.
अंकितचा चुलत भाऊ शैलेश याने याने पोलिसात तक्रार दिली आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, चित्रा आणि तिचा पती हेमंत (रा. गाव बनैल पोलीस स्टेशन खुर्जा जिल्हा बुलंदशहर) आणि भाऊ अमित आणि सनी (रा. नारायण नगर, एटा) हे अंकितच्या मृत्यूला कारणीभूत आहेत. चित्रा आणि अंकितचे प्रेमसंबंध होते आणि त्यांना लग्न करायचे होते. परंतु चित्राचे कुटुंबीय तयार नव्हते आणि त्यांनी बुलंदशहरमध्ये तिचे लग्न लावून दिले, परंतु चित्राच्या भावाचा अंकितवर राग होता. १२ मार्चला चित्राचा फोन आला. १६ मार्च रोजी नारायण नगर येथे विषाची घटना घडली.
वास्तविक, लग्नानंतरही चित्रा तिचा प्रियकर अंकितला भेटत असे. १६ मार्चलाही चित्राने अंकितला एटा बसस्थानकावर फोन केला. येथेच चित्रा हिने अंकितला कोल्ड्रिंकमध्ये विष मिसळून पाजले. काही वेळ बोलून चित्रा तिच्या घरी गेली. काही वेळाने अंकितची तब्येत बिघडू लागल्यावर अंकित बसमध्ये चढून मैनपुरीला गेला. तब्येत बिघडल्याने अंकितने भावाला घरी बोलावून कोल्ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळून दिल्याचे सांगितले. त्यानंतर अंकितची प्रकृती ढासळली. अंकितला मैनपुरी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला.
Crime Girl Friend Given Poison to Boy friend in Cold drink