इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – महिला, तरुणी आणि अल्पमुलींवर गेल्या काही महिन्यात लैंगिक अत्याचार, विनयभंग तथा बलात्काराचे प्रकार देशभरातील अनेक राज्यात वाढलेले दिसून येतात. त्यातच बिहार, छत्तीसगड, झारखंड सारख्या राज्यांमध्ये हे प्रमाण अधिक असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. अशाच प्रकारे छत्तीसगडमधील एका गावात अत्यंत अमानुष प्रकार घडला. एका मध्यम वयीन इसमाने आणि एका वृद्ध माणसाने एका बालिकेला पैशाचे आमिष दाखवून सतत तीन दिवस बलात्कार केल्याची भयानक घटना घडली, या प्रकरणामुळे सर्वत्र खराब उडाली आहे.
बलौदाबाजार जिल्ह्यात एका ७६ वर्षीय वृद्धाला आणि एका ४७ वर्षीय मध्यमवयीन व्यक्तीला बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दोघांवर १३ वर्षांच्या मुलीवर तीन दिवस बलात्कार केल्याचा आरोप आहे. १०रुपयांचे आमिष दाखवून दोन्ही आरोपींनी मुलीला पकडून घरी नेले. यानंतर त्यांनी तीन दिवस लैंगिक अत्याचार केला. मुलीच्या शेजारच्या महिलेने त्यांची क्रूरता पाहिली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
बलौदाबाजारच्या पोलिसांनी सांगितले की, आरोपी कुंजराम वर्मा (76 वर्षे) आणि रमेश वर्मा (47 वर्षे) यांना अटक करण्यात आली आहे. दोघांनी 13 वर्षीय मुलीला पैसे देण्याच्या बहाण्याने बोलावून अनैसर्गिक कृत्य केले. मुलीच्या शेजारील महिला व कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर नातेवाईकांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
मुलगी अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. ती स्वत: तिच्या कुटुंबीयांसह कचरा वेचण्याचे काम करते. आरोपीच्या घरातील सर्व जण बाहेर गेले होते. यादरम्यान मुलीवर बलात्काराची घटना घडली. त्याने सहकारी दुकानदारालाही बोलावून घेतले, त्यानेही मुलीवर बलात्कार केला. हे दुष्कर्म तीन दिवस सुरूच होते. मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.
Crime Girl Child Gang Rape Two Arrested