इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – झारखंड मधील रामगड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. अन्य धर्मीय एका तरुणाने अल्पवयीन आदिवासी तरूणीवर प्रेमाचे जाळे टाकले. त्यासाठी त्याने आपले खोटे नाव सांगितले. त्यानंतर त्याने तिच्याशी जवळीक वाढवून शारिरीक संबंध केले. त्याचा अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही तर त्याने अल्पवयीन मुलीला एका ठिकाणी बोलावून त्याच्या सहा मित्रांसह तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना कडक कारवाई केली. छापा टाकून पोलिसांनी ६ आरोपींना अटक करून कारागृहात रवानगी केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजराप्पा येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फेसबुकच्या माध्यमातून मुस्लीम समाजातील तरुणाने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. फेसबुकवर त्याने हिंदू तरुणाच्या नावाने आपला आयडी बनवला होता. अल्पवयीन मुलीला फूस लावून तो तीन महिन्यांपूर्वी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता.
दरम्यान, त्याने त्याचा व्हिडिओही बनवला. तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला सतत ब्लॅकमेल करू लागला. यादरम्यान इतर अनेक मुलांनीही व्हिडिओ व्हायरल करण्याचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर सात तरुणांनी मिळून रात्रभर तिच्यावर बलात्कार केला.
दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता त्यांनी तिला चितारपूर येथील काली चौकात आणून खाली उतरवले. इकडे रात्रभर घरातून बेपत्ता झाल्याने नातेवाईकांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अखेर सकाळी ही अल्पवयीन मुलगी घरी पोहोचली. त्यानंतर नातेवाइकांनी तिची कसोशीने चौकशी केली. असता त्याने सगळा प्रकार सांगितला. तिच्या नातेवाइकांनी राजराप्पा पोलिस ठाण्यात ही माहिती दिली.
दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणाची माहिती मिळताच चार पोलिस ठाण्यामधील चार पोलिस पथकाने छापा टाकून बंदुकीतील सहा आरोपींना अटक केली. पीडितेच्या जबाबावरून राजराप्पा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आणखी एका आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे छापेमारी सुरू आहे.