इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रागाच्या भरात एखादा मनुष्य काय करेल हे सांगता येत नाही. काही वेळा किरकोळ वादातून आणि त्याचे पर्यावसन हाणामारीत होते. रागीट आणि गुंड व्यक्ती रागाच्या भरात एखाद्याचा जीव देखील घेऊ शकतात. इतकेच नव्हे तर काहीजण जाळपोळ आणि गोळीबार करण्यास देखील मागेपुढे पाहत नाहीत. उत्तरप्रदेशात देखील असाच प्रकार घडला. वास्तविक पाहता उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रकार वाढल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
बरेलीच्या बनखाना येथे रात्री जिममध्ये डंबेल उचलण्यावरून दोन तरुणांमध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की मध्यरात्री अचानक एका बाजूच्या नागरिकांनी दुसऱ्या बाजूच्या नागरिकांच्या घरावर हल्ला केला. तसेच संपूर्ण कुटुंबाला मारहाण केली. त्यानंतर गोळीबार आणि दगडफेकीनंतर घराला आग लागली. पोलीस माहिती मिळण्यापूर्वीच आरोपींनी तेथून पळ काढला. अग्निशमन दलाच्या गाडीने धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
गुलाबबाई परिसरातील जिममध्ये सलीम यांचा मुलगा बाबू व इरफान तेथे व्यायामासाठी जातात. रात्री 9.30 वाजता एक व्यक्ती मोहम्मद कैफचे जिममध्ये डंबेल उचलण्यावरून बाबूसोबत भांडण झाले. त्यावेळी मित्रांनी प्रकरण शांत केले. रात्री 11.30 च्या सुमारास सलीम आणि अनीसच्या कुटुंबातील बाबू, इरफान, साबीर असे 20-25 नागरिक अचानक अस्लम रझा यांच्या घरी पोहोचले. त्यांनी दरवाजे तोडून घरात प्रवेश केला. संपूर्ण कुटुंबाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने अस्लमला तलवारीने जखमी केले. त्यांचा मुलगा मोहम्मद कैफ याच्यावर नळाच्या हँडलने हल्ला करण्यात आला.
मोहम्मद कैफची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. अस्लम रझा यांची पत्नी इम्रानालाही मारहाण करण्यात आली. संपूर्ण घराची तोडफोड करण्यात आली. यानंतर घरात पेट्रोल टाकून आग लावली. पोलीस माहिती मिळण्यापूर्वीच हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. शनिवारी रात्री साडेअकरा ते साडेबारा वाजेपर्यंत बाणखान्यात दहशतीचे वातावरण होते. दूध व्यापारी अस्लम रझा यांच्या घराच्या आगीच्या ज्वाला वाढतच होत्या. हल्लेखोरांनी संपूर्ण घराची तोडफोड केली. इतकंच नाही शेजारीच अनेक घरे आहेत, त्याच्या छतांवरही दगडफेक करण्यात आली होती.
वास्तविक अस्लम, कैफ, इम्रान, मोहम्मद रझा आदी घरात झोपले होते. त्यानंतर संतप्त जमावाने लाठ्या-काठ्या, सब्बल, तलवारी आदींनी हल्ला केला. आरडाओरडा होताच परिसरात घबराटीचे वातावरण पसरले. अनेक कुटुंबाने जीव वाचवण्यासाठी बाहेर धाव घेतली. काही वेळातच गोळीबार सुरू झाला. दरम्यान, एका व्यक्तीने पेट्रोल टाकून घराला आग लावली. आग लागल्याचे समजताच बँकेत घबराटीचे वातावरण निर्माण झाले. सुमारे दोन तासांत आग विझवण्यात आली.