नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसात दिल्ली शहरात चोरी दरोडे लुटमार प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच गुन्हेगारांनी पहाटे मोठा दरोडा टाकला. पोलिसांचा गणवेश घालून आलेल्या गुन्हेगारांनी पहाडगंज भागात तब्बल २ कोटींचे दागिने लांबविले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगारांनी खाकी वर्दी (पोलिसांचा गणवेश) परिधान केला होता. गुंडांनी सुमारे दोन कोटी रुपयांचे दागिने लुटले.  हा दरोडा मोठा प्लॅन रचून टाकण्यात आला. कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून दागिने पळवले.
पहाटे चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांना या दरोड्याबाबत काही महत्त्वाचे पुरावे मिळाले असून आरोपींना अटक होऊ शकते.
एका कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून दरोडेखोरांनी हे दागिने पळवले. ही ज्वेलरी चंदिगड आणि लुधियानाला पाठवली जात होती.
या घटनेविषयी माहिती देताना पोलीस म्हणाले की, पहाटे ४.४९ वाजेच्या सुमारास आम्हाला कॉल आला. पहाडगंजमध्ये दोन व्यक्तींनी एका माणसाच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. त्यातून काही सामान चोरून नेले. संपूर्ण तपासानंतर पोलिसांना कळले की या लोकांकडे एक ज्वेलरी बॉक्स होता. तो चंदिगडहून लुधियानाला जात होता.
या घटनेतील आरोप खाकी वर्दीत आला होता. आधी त्याने कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांची चेकिंग करायचे म्हणून थांबवले. तेवढ्यात मागील बाजूने आणखी दोघे आले. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या डोळ्यासमोर अचानक अंधार झाला. या दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांच्या हातातल्या बॅग आणि बॉक्स चोरून नेले. सदर कंपनीने दावा केलाय की, या बॉक्समध्ये सुमारे २ कोटी रुपयांचे दागिने होते. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी सदर प्रकरणाचा वेगाने तपास सुरु केला आहे. या घटनेत काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
Crime Dacoity 2 Crore Gold Stolen Delhi Pahadganj
 
			



