इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोण कधी काय चोरेल याचा नेम नाही. आताही असाच एक वेगळा प्रकार समोर आला आहे. अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे टुपेलो शहरात एका व्यक्तीने छोटे विमान चोरले. विमान चोरल्यानंतर तो शहरातून उडत राहतो. यासोबतच तो वॉलमार्ट स्टोअरवर विमान कोसळण्याची धमकीही देत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना अमेरिकेच्या वेळेनुसार पहाटे ५ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान चोरणाऱ्या पायलटने पोलिसांना ९११ वर कॉल केला होता. त्याच्या धमकीनंतर, यूएस पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि मॉल आणि आसपासचा परिसर रिकामा केला. यासोबतच जोपर्यंत धोका टळला जात नाही तोपर्यंत लोकांनी त्या बाजूला जाऊ नये, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
या विमानाच्या उड्डाणाचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये घरे आणि दुकानांवर सतत घिरट्या घालताना दिसत आहे. दरम्यान, तुपेलो पोलीस विभागाकडून या प्रकरणाबाबत निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यानुसार चोरीला गेलेले विमान हे किंग एअर प्रकारचे आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. ज्या भागात विमान खाली पडण्याची भीती होती तो भाग रिकामा करण्यात आला आहे.
https://twitter.com/CityKing_Gank_/status/1566027897357352962?s=20&t=QDLtIIBnzhMYlPev3VukQw
Crime Aircraft Theft Man Threat Police
America USA Mississippi Plane