इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कायम चर्चेत असलेली जोडी म्हणजेच भारतीय क्रिकेट संघाचा स्टार लेग स्पिनर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा याचं नातं सध्या चर्चेत आहे. नुकतंच धनश्रीने तिच्या सोशल मीडियावरून चहल हे आडनाव काढून टाकलं होत. त्यामुळे या दोघांमध्ये काही बिनसलं असल्याच्या चर्चांना उधाण आलं होत. त्यावर धनश्रीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहित चर्चांना पूर्णविराम दिला आहे. युजवेंद्रनेही यावर इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली होती. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन त्याने चाहत्यांना केलं होतं. लग्नानंतर धनश्रीने तिच्या नावापुढे पती युजवेंद्रचं चहल हे आडनाव जोडलं होतं.
धनश्री वर्मा ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. गाण्यांवर भन्नाट डान्स करत ती त्याचे व्हिडीओ शेअर करत असते. मुख्य बाब म्हणजे तिचे लाखो फॉलोअर आहेत. तर पती युजवेंद्र चहल हा देखील सोशल मीडियावर सक्रिय असतो. धनश्री हिने तिच्या सोशल मीडियाच्या खात्यावरून चहल हे आडनाव हटवलं त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल चर्चाना भलतेच उधाण आले होते. मात्र यावर या दोघांनी आता मौन सोडल आहे. ‘प्रत्येकाला विनंती आहे की, आमच्या नात्याबद्दलच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कृपया हे तात्काळ थांबवा’, अशी पोस्ट धनश्रीने लिहिली आहे.
तर ‘तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की आमच्या नात्याबद्दलच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. कृपया, या अफवा थांबवा. सर्वांना भरपूर प्रेम,’ अशी पोस्ट युजवेंद्रनंही लिहिली होती. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांची पहिली भेट एका ऑनलाइन डान्स क्लासदरम्यान झाली होती. चहलने नृत्य शिकण्यासाठी धनश्री वर्माच्या वर्गात प्रवेश घेतला होता. इथूनच दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली आणि दोघांनी लग्न केलं. धनश्री वर्मा एक प्रोफेशनल कोरिओग्राफर आणि डान्सरही आहे. ती इन्स्टाग्रामवर सतत तिच्या डान्सचे व्हिडिओ पोस्ट करत असते. धनश्री वर्माने युजवेंद्र चहलसोबत मिळून अनेक रील्स बनवल्या आहेत. ती पेशाने डॉक्टर आहे.
Cricketer Yuzvendra Chahal Wife Dhanashree Varma Dispute Clarification