शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भरदिवसा बँक ऑफ इंडियावर दरोडा; CBI अधिकारी बनून आले अन् ३५ लाख लुटून नेले

by India Darpan
ऑगस्ट 21, 2022 | 6:40 pm
in क्राईम डायरी
0
bank of india

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशभरातील बँकांमध्ये  सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. सुरक्षा रक्षक देखील असतात. तरीही बँकेत दरोड्याच्या घटना घडतात. विशेषतः उत्तर प्रदेश व बिहारसारख्या राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. सध्या देखील अशीच घटना उघड झाली आहे.चित्रपट स्टाईल प्रमाणे बँकेत दरोडा पडला आहे.

चित्रपट अभिनेता अक्षय कुमारच्या ‘स्पेशल-26’ चित्रपटात खोटी सीबीआय किंवा आयकर विभागाची टीम बनून चोरी केल्याचे दाखवण्यात आले आहे. तशाच प्रकारची घटना जमशेदपूरमध्ये घडली आहे. येथील बँक ऑफ इंडियामध्ये ‘स्पेशल-26’ स्टाईलने दरोडा टाकल्याची घटना समोर आहे. विशेष म्हणजे मास्क घातलेल्या चार चोरट्यांनी पिस्तुलाच्या धाकावर बँकेतील कर्मचाऱ्यांना बंधक बनवून 35 लाख रुपये लुटले. घटनेच्या वेळी बँकेत डझनभर ग्राहक होते, त्यांचे मोबाईलही चोरट्यांनी हिसकावले. विशेष म्हणजे, सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी करून दरोडेखोरांनी बनावट धाडीच्या नावाखाली बँक लुटली.

या घटनेची माहिती मिळताच एसएसपी प्रभात कुमार यांनी तपास केला. बँकेच्या आत ओलिस ठेवलेल्या ग्राहकांनी सांगितले की, मास्क घातलेल्या दरोडेखोरांनी आधी बँकेत प्रवेश केला आणि ग्राहकांचे मोबाईल घेतले. मोबाईल घेताना त्यांनी सीबीआचा छापा असल्याचे सांगितले. सुरुवातीला अनेक जणांना खरे वाटले. यानंतर दरोडेखोरांनी बँक कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले आणि पिस्तुलचा धाक दाखवत बँकेतून 35 लाख लुटले. जाताना चोरट्यांनी गेटला बाहेरुन कुलूप लावले. नंतर ग्राहकांनी खिडकीतून बाहेर डोकावून आवाज दिला आणि इतरांना बँकेत दरोडा पडल्याचे सांगितले. भरदिवसा दरोडा पडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत तातडीने चौकशी करावी अशी मागणी पोलिसांकडे करण्यात येत आहे.

Dacoity State Bank of India looted 35 Lakh
Crime Jamshedpur

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

यजुवेंद्र चहलसोबत वाद आहेत? पत्नी धनश्री वर्मा म्हणाली….

Next Post

येवला तालुक्यात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात काळविटाचा मृत्यू

Next Post
IMG 20220821 WA0031 1 e1661087589969

येवला तालुक्यात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात काळविटाचा मृत्यू

ताज्या बातम्या

1500x500 1024x341 1 e1747389571661

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅट्ट्रिक…५८ सुवर्ण, ४७ रौप्य, ५३ कांस्यसह १५८ पदकांची लयलूट

मे 16, 2025
accident 11

भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ५४ वर्षीय पादचारीचा मृत्यू

मे 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

या ठिकाणी जप्त केलेल्या २३ वाहनांची लिलावाव्दारे होणार विक्री….

मे 16, 2025
old man

एल्डर लाईन १४५६७: ज्येष्ठांसाठी आधारवड ठरणारी मदतीची शासकीय सेवा..

मे 16, 2025
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारत सरकारने तुर्कीच्या या कंपनीला दिलेली सुरक्षा परवानगी केली रद्द….

मे 16, 2025
fir111

या तालुक्यात ३८ वेठबिगार व ३१ बालकामगारांची मुक्तता…प्रशासनाने धडक कारवाई करत ठेकेदारावर दाखल केला गुन्हा

मे 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011