इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याचे एक ट्विट सध्या चांगलेच गाजत आहे. या ट्विटमध्ये विराटने आपला नवा कोरा फोन चोरीला गेल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे त्याचे हे ट्विट कुणीही गांभिर्याने घेतलेले नाही. त्यामुळे हा एखाद्या जाहिरातीचा स्टंट असण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही.
विराट कोहलीचे फॅन फॉलोईंग एखाद्या सूपरस्टार नटापेक्षाही जास्त असावेत. विराट कोहली हे नाव सोशल मीडिया सेंसेशन आहे. त्याने एखादे ट्विट केले तर लाखोंनी लोक त्यावर तुटून पडतात. अर्थात हे ट्विट सामन्यातील परफॉर्मन्सबद्दल असेल तर कधी कौतुक आणि कधी ट्रोलिंगचाही सामना त्याला करावा लागतो. विराटचे नवे ट्विट मात्र लोक एन्जॉय करत आहे. ‘तुमचा नवा फोन बॉक्समधून काढण्यापूर्वीच हरवणं, याहून वाईट काहीच असू शकत नाही. माझा फोन कुणी पाहिला आहे का?’ असे ट्विट त्याने केले आहे. यावर खरं तर त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त व्हावी, अशी अपेक्षा असेल. पण नेटकरी हुशार असतात. त्यांना हे ट्विट जाहिरात स्टंट असण्याची शक्यता वाटली आणि सारे गमतीदारपणे व्यक्त होऊ लागले. एखाद्या मोबाईल कंपनीच्या जाहिरातीशी या ट्विटचा संबंध असावा, असा अंदाज नेटकऱ्यांनी याठिकाणी व्यक्त केला आहे.
https://twitter.com/imVkohli/status/1622823545033342976?s=20&t=-kq-vqmxBiY6ccyn4qxWfg
झोमॅटो म्हणाले ‘वहिनींचा फोन वापरा’
यावर सर्वसामान्य युझर्स ट्विट करत असतानाच झोमॅटोनेही उडी घेतली. ‘तुम्ही आमच्याकडून आईसक्रीम मागवू शकता. आणि त्यासाठी तुम्ही वहिनींचा फोन नक्कीच वापरू शकता,’ असे झोमॅटोने म्हटले आहे. विशेष म्हणजे एखादी मोठी कंपनी जेव्हा अशाप्रकारचे ट्विट करते तेव्हा नक्कीच विराटचा हा जाहिरात स्टंट असावा, अशी शक्यता बळावते.
खेळात लक्ष लागेल
नेटकरी जेवढे डोक्यावर घेऊन नाचतात तेवढेच ते खालीही आणतात. विराटच्या या ट्विटवर एकाने तर थेट त्याच्या खेळावरच हल्ला चढवला आहे. ‘आता तरी किमान खेळावर लक्ष लागून राहील’, अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
Cricketer Virat Kohli Smartphone Lose What Next Happen