इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतरत्न सचिन तेंडुलकर नुकताच ५० वर्षांचा झाला. या वाढदिवसाचे सेलिब्रेशन त्याने कोकणात जाऊन केले. सहकुटुंब कोकण दौऱ्यावर गेलेला सचिन हा सगळ्यांच्याच आकर्षणाचे आणि कौतुकाचा विषय ठरला. कुठेही परदेशात न जाता त्याने कोकणात जाऊन वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले, याचं सगळ्यांना कौतुक वाटलं. विशेष म्हणजे सचिनने तिथे जाऊन आपला सगळा मानमरातब बाजूला ठेवत चुलीवर स्वयंपाकही केला.
सोशल मिडीयावर ‘जेवण’ व्हायरल
सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी, मुलगी एका गावात पोहोचले आहेत. सचिनने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये त्याच्या संपूर्ण कुटुंबासह त्याची पत्नी अंजली आणि मुलगी सारा तेंडुलकरसोबत दिसत आहे. सचिनने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो निसर्गाचा आनंद लुटताना दिसत होता. गावात पारंपरिक पद्धतीने जेवण बनवताना सचिनने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. या छायाचित्रात सचिन तेंडुलकर पत्नी आणि मुलीसह मातीच्या चुलीजवळ बसला असून तोंडाजवळ फुंकणी धरून त्यातून आग पेटवण्याचाचा प्रयत्न करतो आहे. अलीकडेच मी माझा ५०वा वाढदिवस एका शांत गावात साजरा केला जिथे माझी टीम (कुटुंब) माझ्यासोबत होती. सचिनचा मुलगा सध्या मुंबई इंडियन्स या टीममध्ये खेळत असल्यामुळे तो कुटुंबासोबत नाही. सचिन प्रत्येकवेळी नव्या ठिकाणाला भेट देतो आणि तिथले फोटो सोशल मीडियावर शेअर करतो.
सचिनला जेवणाची आवड
सचिनला वैयक्तिक आयुष्यात देखील जेवण बनवण्याची आवड असून यापूर्वी ही त्याने आपल्या कुटुंबासाठी स्वतःच्या हाताने काही पदार्थ तयार केले आहेत. सचिनने मकरसंक्रांती निमित्त तिळाचे लाडू बनवण्याची रेसिपी देखील आपल्या चाहत्यांसोबत व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली होती. आताचा स्वयंपाक करतानाचा हा फोटो सचिन तेंडुलकरने स्वत: ट्विटर अकाऊंटवरती शेअर केला आहे. या फोटोला हजारोच्या संख्येने लाईक मिळाले. या फोटोवरही अनेक कमेंट आल्या आहेत. कमेंट करताना एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, तुम्ही खूप चांगल्या व्यक्ती आहात, मातीशी जोडलेले राहा. दुसरा नेटकरी कमेंट करताना म्हणतोय, खूप छान चित्र.
https://twitter.com/sachin_rt/status/1654462149073272834?s=20
Cricketer Sachin Tendulkar Cooking Food