इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – महेंद्रसिंह धोनी आवडत नसेल असं क्वचित कोणी आढळेल. त्याचे लाखो चाहते देशातच नाही तर जगभरात सापडतील. धोनी हा स्वतःच एक ब्रँड आहे. तर धोनीच्याच एका कंपनीच्या सीईओबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सासूच सांभाळते कंपनी
शीला सिंह या धोनी प्रॉडक्शन हाऊस ‘धोनी एंटरटेनमेंट लिमिटेड’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. या कंपनीची करोडोंची उलाढाल आहे. या शीला सिंह धोनीची पत्नी साक्षी सिंहची आई म्हणजेच धोनीची सासू आहे. आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार आला तेव्हा धोनीने कुटुंबातील सदस्यांवर अधिक विश्वास दाखवला आणि आपल्या सासूवर एक मोठी जबाबदारी सोपवली. २०२० पासून त्या ही कंपनी सांभाळत आहेत. यासोबतच धोनीची पत्नी साक्षी धोनी देखील ही कंपनी सांभाळते आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शीला सिंह आणि साक्षी धोनीच्या नेतृत्वाखाली धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडची एकूण संपत्ती ८०० कोटींहून अधिक आहे. साक्षी धोनी सध्या धोनीच्या प्रॉडक्शन हाऊसची सर्वात मोठी शेअरहोल्डर आहे. सध्या या कंपनीची संपत्ती 1030 कोटींवर पोहोचली आहे.
कंपनी नवीन उंचीवर
कंपनीची एकूण संपत्ती अवघ्या चार वर्षांत ८०० कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. सध्या साक्षी धोनीकडे एमएस धोनीच्या प्रोडक्शन कंपनीत बहुसंख्य हिस्सा आहे. धोनीने अनेक व्यवसाय आणि प्रकल्पांमध्ये पैसे गुंतवले आहेत. त्यामुळे त्यांची एकूण संपत्ती १००० कोटी रुपये आहे. एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात शीला सिंह यांचे पती आरके सिंह हे धोनीचे वडील पान सिंह धोनी यांच्यासोबत कनोई ग्रुपच्या ‘बिनागुरी टी कंपनी’मध्ये काम करायचे. त्यावेळी शीला सिंह गृहिणी होत्या.