मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘भारत माझा देश आहे, ‘ ही प्रतिज्ञा आपण लहानपणापासून शाळेत शिकत असल्यापासून म्हणत आलो आहोत, त्यामुळे आपल्या देशाचे नाव भारत हे आहे. त्याचप्रमाणे पूर्वी त्याला हिंदुस्तान म्हणतात तर ब्रिटिश काळात त्याला इंडिया हे नाव पडले. वास्तविक इंडिया हे नाव आधीही प्रचलीत होते. परंतु शक्यतो भारत हेच नाव प्रचलित आहे. मात्र काही जण विनाकारणच वादग्रस्त वक्तव्य करून आपल्या स्वतःची प्रसिद्धी वाढवत असतात.
यापूर्वी अभिनेत्री कंगना रणौतने आपल्या देशाचे नाव भारत असावे अशी मागणी केली होती, आता आणखी एका महिलेने अशाप्रकारे मागणी केली आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहाँ कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत ही असतेच. मध्यंतरीच त्या दोघांमधील वादावरुन सोशल मिडियामध्ये चर्चेचा विषय बनला होता, असे असतानाच इंडियाचे नाव हे भारत किंवा हिंदुस्थान ठेवण्याचे आवाहन तिने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना केले आहे. त्यामुळे तिच्या या अजब मागणीमुळे पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे.
दुसरीकडे संविधानाच्या पहिल्या अनुच्छेदात भारताला इंडिया किंवा भारत संबोधलं जाईल असं म्हटलं आहे. तरीही शमीच्या बायकोने इंडियाचं नाव भारत ठेवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे हसीन जहाँ किंवा कंगनाने जरी इंडिया हे नाव ब्रिटीशांनी दिल्याचा दावा केला असला तरी इंडिया हा शब्द मूळच्या लॅटीन भाषेतून आलाय. इंडिया नावाबद्दल सांगायचं झाल्यास या शब्दाचा उगम हा लॅटीन भाषेत सापडतो. इंडस या पर्शियन नावाने सिंधू नदी ओळखळी जायची. याच नदीच्या आजूबाजूचा परिसर या अर्थाने सिंधू नदीच्या पूर्वेकडील भूभागाला ग्रीक आणि पर्शियन लोकांनी इंडिया असं नाव दिल्याचं सांगितलं जातं. नंतर हळूहळू सिंधू नदीपासून ते पूर्व आणि दक्षिणेपर्यंतच्या भूभागाला इंडिया नावाने संबोधलं जाऊ लागल्याचं सांगण्यात येतं.
हसीन जहाँने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याद्वारे तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खास आवाहन केलं आहे. आपला देश, आमचा सन्मान. माझं भारतावर प्रेम आहे. आपल्या देशाचे नाव फक्त हिंदुस्थान किंवा भारत असे असले पाहिजे. पंतप्रधान, गृहमंत्र्यांना भारताचे नाव बदलण्याची विनंती केलीआहे. जेणेकरून संपूर्ण जग आपल्या देशाला भारत बनवेल असेही ती म्हणाली आहे.
हसीन जहाँने देशाचं नाव बदलण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलं आहे. देशाचं ‘इंडिया’ हे नाव बदलून ‘भारत’ असं करण्याची मागणी आपल्या पोस्टमधून केलीय. ‘इंडिया’ हे नाव ब्रिटीशांनी ठेवलं असून ते गुलामगिरीची आठवण करून देणारं आहे, तिने मांडलेल्या या मुद्द्यानंतर आपल्या देशाला नाव नक्की कसं पडलं यासंदर्भातील चर्चा सुरु झाल्या आहेत. म्हणजेच भारत, हिंदुस्तान, इंडिया ही नावं देशाला कशी पडली यासंदर्भात अनेकांना माहिती नाही.
हसीन जहां आणि मोहम्मद शमी बऱ्याच काळापासून वेगळे राहत आहेत. वर्ष 2018 मध्ये दोघांमध्ये वाद झाला होता, त्यात हसीन जहाँने शमीला मारहाण केली. मोहम्मद शमी आणि हसीन जहां यांनी 2014 मध्ये लग्न केलं होतं. 2018 साली हसीन जहांने मोहम्मद शमीवर आरोप केले होते, इतकंच नाही तर त्याच्यावर मॅच फिक्सिंगचाही आरोप झाला होता.हसीन जहां मॉडेल आहे, ती इन्स्टाग्रामवर अनेक फोटो, रिल्स व्हिडिओ पोस्ट करत असते. जे खूप व्हायरल आहेत. हसीन जहांचे इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्स खूप आहेत. मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहां नेहमी चर्चेत असते. आता पुन्हा एकदा तिची चर्चा सुरू आहे.
Cricketer Mohammad Shami Wife Hasin Jahan Demand
India Country Name Change