मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला कोलकाता न्यायालयाने चांगलाच धक्का दिला आहे. विभक्त पत्नी हसीन जहाँला महिन्याला 1.30 लाख 30 रुपये पोटगी देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. एकूण रकमेपैकी 50 हजार रुपये हसीन जहाँच्या उपयोगासाठी वैयक्तिक पोटगी असेल आणि उर्वरित 80 हजार तिच्यासोबत राहणाऱ्या मुलीच्या देखभालीसाठी असतील.
शमी आणि हसीन जहाँचे कौटुंबीक आयुष्य वादळीच राहिले. बेबनाव निर्माण झाल्यानंतर दोघेही विभक्त झाले. 2018 मध्ये, हसीन जहाँने 10 लाख रुपयांच्या मासिक पोटगीची मागणी करत कोर्टात धाव घेतली होती. त्यापैकी 7 लाख रुपये तिची वैयक्तिक पोटगी आणि उर्वरित 3,00,000 रुपये तिच्या मुलीच्या देखभालीसाठी खर्च केले जातील, अशी विनवनी तिने न्यायालयाला केली होती.
7 कोटीहून अधिक उत्पन्न
भारताचा वेगवान गोलंदाज शमीच्या 2020-21 या आर्थिक वर्षाच्या आयकर रिटर्ननुसार, त्या आर्थिक वर्षासाठी त्याचे वार्षिक उत्पन्न 7 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते आणि त्यावर आधारित केलेली मासिक 10 लाखांची पोटगी अवाजवी नव्हती, असा दावा हसीन जहाँने केला होता. त्यावर मोहम्मद शामीचे वकील सेलिम रहमान यांनी विरोध केला. हसीन जहाँ स्वतः व्यावसायिक फॅशन मॉडेल म्हणून काम करत असून स्थिर उत्पन्न मिळवत असल्याने, त्यांची उच्च पोटगीची मागणी योग्य नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.
हसीन जहाँकडून कृतज्ञता
दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कनिष्ठ न्यायालयाने सोमवारी मासिक पोटगीची रक्कम 1 लाख 30 हजार रुपये निश्चित केली. कोर्टाच्या निर्देशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना हसीन जहाँने दावा केला की, मासिक पोटगीची रक्कम जास्त असती तर तिला दिलासा मिळाला असता. याप्रकरणी अद्याप भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही
Cricketer Mohammad Shami Court Monthly Alimony Wife