मुंबई – क्रिकेटमध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे चेंडू आहे. आता हा चेंडूच जर कुणी पळवून नेला तर काय होईल ? अर्थातच खेळ बंद पडेल. एका क्रिकेट सामन्यांमध्ये चक्क कुत्र्यानेच चेंडू पळवून नेल्याने बराच वेळ खेळ थांबला.
आयर्लंडमध्ये महिला क्रिकेटचा टी -20 चषकासाठी उपांत्य सामना बायर्डी आणि सीएसएनआय संघादरम्यान खेळला गेला, या सामन्यात एक विचित्र घटना घडली आणि या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली, कारण या सामन्यादरम्यान कुत्र्याने तोंडात चेंडू पकडला अन् तो घेऊन पळाला. त्यामुळे सामन्यात व्यत्यय आला. वास्तविक एखाद्या प्राण्यामुळे सामना थांबवण्याची ही पहिली वेळ नाही. भारतासह अनेक देशांमध्ये कुत्रे, मांजरी, साप किंवा इतर प्राण्यांमुळे सामना अनेक वेळा थांबला आहे. आता या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
आयर्लंडमध्ये महिला टी -20 चषकाचा उपांत्य सामना सामना बायर्डी आणि सस्नी यांच्यात खेळला जात होता. या खेळा दरम्यान, जेव्हा सीएसएनआय संघ फलंदाजी करत होता, तेव्हा गोलंदाजाने चेंडू फेकला, तेव्हा एक कुत्रा त्याच दिशेने धावत होता. त्या वेळी चेंडू कुत्र्याला लागला नाही पण त्याने चेंडू तोंडातून पकडला. आणि पळाला. त्यामुळे क्षेत्ररक्षक त्याला थांबविण्याचा प्रयत्न करत राहिले, पण कुत्रा इकडून तिकडे पळत राहिला.
दरम्यान, काही क्षणातच एक मूल मैदानावर धावत आले आणि त्याने या कुत्र्याला पकडले. कारण हा मुलगा या कुत्र्याचा मालक होता. अखेर त्या मुलाने कुत्र्या कडून चेंडू हिसकावून तो खेळाडूंना दिला. त्यानंतरच सामना सुरू होऊ शकला. एखाद्या प्राण्यामुळे सामना थांबवण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही अनेक देशांमध्ये अशा घटना घडल्या आहेत.
? Great fielding…by a small furry pitch invader!@ClearSpeaks #AIT20 ? pic.twitter.com/Oe1cxUANE5
— Ireland Women’s Cricket (@IrishWomensCric) September 11, 2021