इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – खेळाडूंच्या आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या अपेक्षेप्रमाणे भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना भारताने तब्बल 119 धावांनी जिंकत मालिकाही 3-0 च्या फरकाने जिंकली आहे. विशेष म्हणजे 1983 पासून प्रथमच भारताने वेस्ट इंडीजला त्यांच्या मायभूमीत व्हाईट वॉश दिला, आणि पोर्ट ऑफ स्पेनमध्ये तिरंगा फडकवला गेला.
भारताने वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. भारतीय संघानं तिसरा एकदिवसीय सामना डकवर्थ लुईस नियमानुसार जिंकला. आणि यासह एकदिवसीय मालिकाही जिंकली. तिसऱ्या वनडेत धवन, चहल आणि गिल यांची भूमिका भारतासाठी महत्त्वाची होती. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा त्यांच्याच भूमीवर सर्वात मोठा विजय आहे. वेस्ट इंडिजच्या भूमीवर प्रथमच वनडे मालिकेतील सर्व सामने जिंकण्यात टीम इंडियाला यश आले.
या ऐतिहासिक मालिका विजयात शुभमन गिलने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानं नाबाद 98 धावांची खेळी खेळली. त्याच्याशिवाय 4 खेळाडूंचा विजयात महत्त्वाचा वाटा होता. सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी घेतली. तुफान फटकेबाजीनंतरही पावसाच्या व्यत्ययामुळे भारत 36 षटकंच खेळू शकला. यात 225 धावा भारताने केल्या. ज्यानंतर विजयासाठी वेस्ट इंडीजला 35 षटकात 257 धावा करायच्या होत्या. पण भारतीय गोलंदाजांच्या दमदार गोलंदाजीनंतर 137 धावांतच वेस्ट इंडीज सर्वबाद झाल्याने भारताने सामना हा जिंकला आहे.
From The #TeamIndia Dressing Room!
Head Coach Rahul Dravid & Captain @SDhawan25 applaud ? ? the team post the 3-0 win in the #WIvIND ODI series. ? ?
Here's a Dressing Room POV ? – By @28anand
P.S. Watch out for the end – expect something fun when Shikhar D is around ?? pic.twitter.com/x2j2Qm4XxZ
— BCCI (@BCCI) July 28, 2022
सामन्यात भारताचा कर्णधार शिखरने अर्धशतक (58) झळकावून बाद झाल्यावर श्रेयसने गिलला साथ देत चांगला खेळ कायम ठेवला. नंतर श्रेयस (44) आणि पाठोपाठ सूर्यकुमार (8) बाद झाला. पण गिलने फटकेबाजी कायम ठेवली. पण सतत पावसाने हजेरी लावल्यामुळे सामन्यात विलंब झाला अखेर 36 षटकानंतर सामना थांबवण्यात आला. गिलने नाबाद 98 धावा केल्या असून आता वेस्ट इंडीज फलंदाजी करत असून त्यांना विजयासाठी 35 षटकांत 257 रन करायचे होते.
शुभमन गिलने शिखर धवन सोबत पहिल्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी केली. शिखर धवननं वनडे कारकिर्दीतील 38 वे अर्धशतक झळकावलं. त्याने आपल्या खेळीत सात चौकार मारले. अशाप्रकारे त्याच्या एकदिवसीय सामन्यात 800 चौकार पूर्ण झाले आहेत. अशी कामगिरी करणारा तो 9वा भारतीय ठरला आहे. या डावात वेस्ट इंडिजविरुद्ध 1000 धावा पूर्ण करणारा धवन जगातील 22 वा फलंदाज ठरला.
दुसऱ्या बाजूला 35 षटकात 257 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या वेस्ट इंडीजला पहिल्या षटकातच सिराजने दोन दमदार झटके दिले. त्यानंतर एक-एक करत गडी बाद होत गेले. वेस्ट इंडीजकडून कर्णधार निकोलस पूरन आणि ब्रँडन किंग यांनी सर्वाधिक 42 धावा केल्या. पण भारताच्या भेदक गोलंदाजीत कोणाचाच निभाव लागला आहे. ज्यामुळे अखेर भारकडून चहलने सर्वाधिक 4 गडी बाद केले. शार्दूल आणि सिराजने प्रत्येकी दोन तर अक्षर पटेल आणि प्रसिध कृष्णा यांनी एक-एक विकेट घेतली. 137 धावांतच वेस्ट इंडीज सर्वबाद झाल्याने भारताने सामना 119 धावांनी जिंकला आहे. नाबाद 98 धावा ठोकणाऱ्या शुभमनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. आणि मालिकावीर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.
.@yuzi_chahal scalped 4⃣ wickets and was our top performer from the second innings of the third #WIvIND ODI. ? ?
Here's his bowling summary ? pic.twitter.com/GdssmjgASZ
— BCCI (@BCCI) July 27, 2022
पावसामुळे अडचणीत सापडलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडिजवर 119 धावांनी विजय मिळवत मालिका 3-0 ने क्लीन स्वीप केली. भारताच्या डावातील 24 षटके पूर्ण झाल्यानंतर पावसामुळे सामना थांबवण्यात आला आणि सामना 40 षटकांचा करण्यात आला. दुसऱ्यांदा भारतीय डावाची 36 षटके पूर्ण झाल्यानंतर पावसानं हजेरी लावली आणि पाहुण्या संघाचा डाव तीन विकेट्सवर 225 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर डकवर्थ लुईस पद्धतीनं वेस्ट इंडिजला 35 षटकांत 257 धावांचे लक्ष्य मिळाले. कॅरेबियन संघ अवघ्या 137 धावांत सर्वबाद झाला.
खरे म्हणजे वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली आणि त्यांनी दुसऱ्याच षटकात काईल मायर्स (0) आणि शमराह ब्रूक्स (0) यांचे विकेट गमावले, तर संघाचे धावांचे खातेही उघडले नाही. मोहम्मद सिराजने पहिल्याच चेंडूवर मायर्सला बाद केल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर ब्रूक्सला लेग-बिफोर झाला. ब्रेंडन किंगनं पाचव्या षटकात अक्षर पटेलवर षटकार खेचून डावाची पहिली चौकार लगावला. तर सलामीवीर शाई होपनेही सिराजचा चेंडू प्रेक्षकांच्या ताब्यात घेतला. मात्र, 33 चेंडूत 22 धावा केल्यानंतर शाई होपनं युझवेंद्र चहलचा पुढे खेळण्याचा प्रयत्न चुकवला. तर वेस्ट इंडिजचे धावांचे शतक 18व्या षटकात पूर्ण झाले. शार्दुल ठाकूरने मिडऑनला अकील हुसेनला (1) धवनकडून झेलबाद करून वेस्ट इंडिजला धक्का दिला. चहलनं कीमो पॉलला खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि त्यानंतर हेडन वॉल्श ज्युनियर (10) देखील स्लिपमध्ये धवनकरवी झेलबाद झाला. त्याने जेडेन सील्सला (0) गिलकडे झेलबाद करून भारताला विजय मिळवून दिला.
Cricket India West Indies One Day Match Series Win History