मंगळवार, जुलै 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आशिया कप… भारत-पाक सामन्याचा थरार या दिवशी… आजच नियोजन करा… असे आहे संपूर्ण वेळापत्रक

by Gautam Sancheti
ऑगस्ट 31, 2023 | 5:21 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Asia Cup 2022 e1683624986348


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या आशिया कप २०२३ स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेचे आयोजन श्रीलंका आणि पाकिस्तान या देशांमध्ये हायब्रिड पद्धतीने होणार आहे. स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. तर १७ सप्टेंबरला महाअंतिम सामना पार पडणार आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि आशियाई क्रिकेट परिषद (ACC) यांनी आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. यावेळी ही स्पर्धा ‘हायब्रीड मॉडेल’मध्ये होणार आहे. आशिया चषकाचे सामने पाकिस्तान आणि श्रीलंकेत होणार आहेत. भारतीय संघाने पाकिस्तान दौऱ्याला नकार दिल्यानंतर एसीसीने पीसीबीचे ‘हायब्रिड मॉडेल’ स्वीकारले. टीम इंडिया आपले सामने श्रीलंकेत खेळणार आहे. २ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे.

आशिया कप स्पर्धेचे अध्यक्ष जय शाह यांनी म्हटले आहे की, “मला बहुप्रतिक्षित पुरुष एकदिवसीय आशिया चषक २०२३ चे वेळापत्रक जाहीर करताना आनंद होत आहे, जे विविध देशांना एकत्र बांधणारे एकतेचे प्रतीक आहे. क्रिकेटच्या उत्कृष्टतेच्या उत्सवात आपण सामील होऊ या आणि आपल्या सर्वांना जोडणाऱ्या बंधांची कदर करू या.

स्पर्धेचे वेळापत्रक असे
तारीख… सामना… ठिकाण
३० ऑगस्ट – पाकिस्तान विरुद्ध नेपाळ – मुलतान
३१ ऑगस्ट – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका – कॅंडी
२ सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध भारत – कॅंडी
३ सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान – लाहोर
४ सप्टेंबर – भारत विरुद्ध नेपाळ – कॅंडी
५ सप्टेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका – लाहोर

सुपर-४ फेरी
६ सप्टेंबर A1 वि B2 लाहोर
९ सप्टेंबर B1 वि B2 कोलंबो
१० सप्टेंबर A1 वि A2 कोलंबो
१२ सप्टेंबर A2 v B1 कोलंबो
१४ सप्टेंबर A1 वि B1 कोलंबो
१५ सप्टेंबर A2 वि B2 कोलंबो
अंतिम सामना
१७ सप्टेंबर सुपर4 – 1 विरुद्ध 2 कोलंबो

स्पर्धेतील सहा संघांची प्रत्येकी दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत, यजमान पाकिस्तान आणि नेपाळ अ गटात आहेत. तर ब गटात बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका आहेत. सलामीचा सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुलतान येथे ३० ऑगस्ट रोजी होणार आहे. त्याचवेळी, श्रीलंकेच्या भूमीवर पहिला सामना बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात ३१ ऑगस्ट रोजी कॅंडीमध्ये होणार आहे.
भारतीय संघ २ सप्टेंबरला कँडीत पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. त्यानंतर ४ सप्टेंबरला त्याच मैदानावर त्याचा सामना नेपाळशी होणार आहे.

प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर फोरसाठी पात्र ठरतील आणि या टप्प्यातील अव्वल दोन संघ अंतिम फेरीत प्रवेश करतील. यावेळी आशिया कप ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल. विश्वचषकापूर्वी संघांना त्यांच्या तयारीला अंतिम रूप देण्याची ही सुवर्णसंधी असेल.
पीसीबीने तयार केलेल्या मूळ मॉडेलनुसार, पाकिस्तानने फक्त एका शहरात चार सामने आयोजित करायचे होते. तथापि, नवीन अध्यक्ष झका अश्रफ यांच्या नेतृत्वाखालील पीसीबी प्रशासनाने या महिन्यात पदभार स्वीकारल्यानंतर मुलतान हे दुसरे ठिकाण म्हणून जोडले गेले. मुलतानला फक्त सलामीच्या सामन्याचे यजमानपद मिळणार आहे, तर लाहोरमध्ये तीन सामने होणार आहेत. त्यात सुपर फोरच्या सामन्याचा समावेश आहे.

बांगलादेश ३ सप्टेंबरला लाहोरमध्ये अफगाणिस्तानशी खेळणार आहे आणि त्यानंतर ५ सप्टेंबरला श्रीलंका अफगाणिस्तानशी खेळेल. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांग्लादेश हे संघ पहिल्या फेरीत अव्वल चारपैकी कोणतेही स्थान मिळवू शकतात, परंतु या संघांचा क्रम निश्चित राहील, असेही या वेळापत्रकात नमूद करण्यात आले आहे. पाकिस्तान A1 असेल आणि भारत A2 असेल. श्रीलंका B1 आणि बांगलादेश B2 असेल. नेपाळ आणि अफगाणिस्तानने सुपर फोरमध्ये प्रगती केल्यास ते बाहेर पडलेल्या संघाची जागा घेतील.

I am happy to announce the schedule for the highly anticipated Men's ODI #AsiaCup2023, a symbol of unity and togetherness binding diverse nations together! Let's join hands in the celebration of cricketing excellence and cherish the bonds that connect us all. @ACCMedia1 pic.twitter.com/9uPgx6intP

— Jay Shah (@JayShah) July 19, 2023

cricket Asia cup schedule India Pakistan match
Sports Cricket ODI

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दोन हजार रुपयांची नोटा बंदी का करण्यात आली… हा निर्णय का घेण्यात आला… ही आहेत महत्त्वाची कारणे…

Next Post

शिंदे-ठाकरे गट आमनेसामने… दहीहंडी उत्सवावरुन राजकारण तापले… कोण बाजी मारणार…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
eknath shinde uddhav thakre

शिंदे-ठाकरे गट आमनेसामने... दहीहंडी उत्सवावरुन राजकारण तापले... कोण बाजी मारणार...

ताज्या बातम्या

Screenshot 20250714 200642 Collage Maker GridArt 1

नाशिक जिल्हा परिषदेच्या सुपर ५० उपक्रमातील ६ विद्यार्थ्यांची आयआयटीत निवड…

जुलै 14, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884

विजयी मेळावा हा मराठीच्या मुद्द्यावर होता, राजकारणाशी संबध नाही…राज ठाकरे

जुलै 14, 2025
VidhanSabha prashnottare 04 1024x512 1

पाणीपुरवठा प्रकल्पात एकाच कामासाठी दोन योजना; विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

जुलै 14, 2025
Mhada Home e1680604067392

घरांची विक्री मंदावली,खरेदीदार अधिक सावध…बघा, हा अहवाल

जुलै 14, 2025
Shirdi Sai baba e1727984889927

शिर्डी येथे गुरुपौर्णिमा उत्सवात साईबाबा संस्थानला ६.३१ कोटींहून अधिक देणगी प्राप्त

जुलै 14, 2025
Untitled 32

नाशिकच्या या नेत्याचा ३०० कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटात मुंबईत प्रवेश…

जुलै 14, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011