मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऑस्ट्रेलियात भारत – दक्षिण आफ्रिका दरम्यान सुरू असलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने १३३ धावसंख्येचे आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवले आहे. या सामन्यात ९ खेळाडू गमावत ही धावसंख्या भारतीय संघाने केली आहे. भारताने टॅास जिंकत पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, मोठी धावसंख्या भारतीय संघाला उभारता आली नाही.
दक्षिण आफ्रिका दरम्यान सामना पर्थ स्टेडियमवर हा सामना सुरु आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर सुरु आहे. भारत ४ गुणांसह गटात आघाडीवर आहे. ही आघाडी कायम ठेवण्यासाठी भारताला विजयाची हॅट्रिक करण्याची संधी आहे. पण, कमी धावसंख्या झाल्यामुळे आता भारतीय संघापुढे आव्हान आहे. या सामन्यात सुर्याने ४० बॅालमध्ये ६८ धावा केल्या. रोहित शर्माने १५ धाव केल्या. लोकेश राहुल ९ धावावर बाद झाला. तर फॅार्मध्ये असलेला विराट कोहली सुध्दा या सामन्यात १२ धावावर बाद झाला. दीपक हुडाला भोपळाही फोडला आला नाही. दिनेश कार्तिकने सहा धावा केल्या तर हार्दिक पांड्याने २ धावा केल्या.
अशी आहे कामगिरी
टी -२० विश्वचषक स्पर्धेत पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करत विजय मिळवला आहे. त्यानंतर नेदरलँड्सविरुद्ध ५६ धावांनी विजय मिळवला. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या संघानेही दोन्ही सामने जिंकले आहे. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी – २० सामन्यात भारताने १३ तर दक्षिण आफ्रिकेन ९ विजय मिळवले आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्याची टी-20 मालिकाही जिंकली होती.