नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेट्रोल डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यातच रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढल्याने या इंधनाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
सहाजिकच वाहनधारक पेट्रोल डिझेल वरील मोटर सायकल व स्कुटर ऐवजी इलेक्ट्रिक स्कूटरला पसंती देत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सहाजिकच विविध कंपन्या बाजारांमध्ये नवनवीन इलेक्ट्रिक स्कूटर आणत आहेत
Crayon Motors ने भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Envy लाँच केली आहे. या कंपनीचे हे दुसरे उत्पादन आहे. यापूर्वी कंपनीने स्नो प्लस इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली होती. Envy ही कंपनीची दुसरी लो-स्पीड, प्रीमियम ई-स्कूटर आहे.
Crayon Motors Envy लो-स्पीड प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर 64,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. यात मोठी बूट स्पेस, कीलेस स्टार्ट आणि रिव्हर्स असिस्ट सारखी वैशिष्ट्ये आहेत. रिव्हर्स असिस्ट स्कूटरला पुढे-मागे हलवण्यास मदत करते आणि प्रचंड रहदारी व पार्किंगच्या रस्त्यावर ही गाडी चालवताना उपयुक्त ठरते.
Crayon Motors Envy मध्ये पांढरा, काळा, निळा आणि सिल्व्हर असे चार रंग पर्याय मिळतात. कंपनी आपल्या मोटर आणि कंट्रोलरवर 24 महिन्यांची वॉरंटी देत आहे. कंपनी 100 हून अधिक रिटेल स्टोअर्सवर Envy उपलब्ध करून देईल. क्रेयॉन मोटर्स त्याच्या गाझियाबाद उत्पादन युनिटमध्ये स्कूटरचे डिझाइन आणि उत्पादन करते.
एका आकडेवारीनुसार इलेक्ट्रिक वाहनांमध्ये त्यांची मागणी सर्वाधिक आहे ती चालवण्यासाठी प्रति किलोमीटर केवळ 14 पैसे खर्च येणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. जिओ टॅगिंग आणि सेंट्रल लॉकिंग हे सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.
याशिवाय यामध्ये डिजिटल स्पीडोमीटर आणि मोबाईल चार्जिंग देखील देण्यात आले आहे. या Crayon Envy लो-स्पीड स्कूटरचा टॉप स्पीड 25 kmph आहे. कोणत्याही वाहनधारककडे ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही तसेच ते चालवण्यासाठी नवीन नोंदणी आवश्यक नाही.