शनिवार, नोव्हेंबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कोरोना लस घेतल्याने मुलीचा मृत्यूः याचिकाकर्त्यांने सीरमकडे केली एवढ्या पैशांची मागणी

सप्टेंबर 3, 2022 | 2:16 pm
in संमिश्र वार्ता
0
covid vaccine booster dose

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुलीच्या मृत्यूसाठी कोविशिल्डला जबाबदार धरणाऱ्या दिलीप लुनावत नावाच्या व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि इतरांकडून उत्तर मागितले आहे. लुनावत यांनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्याविरोधातही ही याचिका दाखल केली आहे. बिल गेट्स यांच्या फाऊंडेशनने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि भारतातील औषध नियंत्रक यांच्याशी भागीदारी केली होती.

न्यायमूर्ती एसव्ही गंगापूरवाला आणि माधव जामदार यांच्या खंडपीठाने २६ ऑगस्ट रोजी याचिकेतील सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली. या प्रकरणाची सुनावणी १७ नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने दावा केला आहे की त्यांची मुलगी स्नेहल लुनावत ही वैद्यकीय अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी होती. तिला २८ जानेवारी २०२१ रोजी नाशिकमधील तिच्या महाविद्यालयात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारे तयार केलेली अँटी-कोरोनाव्हायरस कोविशिल्ड लस घेण्यास भाग पाडण्यात आले. ती आरोग्य कर्मचारी असल्याने प्राधान्याने ही लस देण्यात आली.

मात्र, काही दिवसांनंतर स्नेहलला तीव्र डोकेदुखी आणि उलट्या होऊ लागल्या आणि तिला रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की तिच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला आहे. तिच्यावर उपचार सुरु असतानाच स्नेहलचा १ मार्च २०२१ रोजी मृत्यू झाला. या सगळ्याला लसच कारणीभूत ठरल्याचा दावा दीलिप लुनावत यांनी केला आहे. ही याचिका केंद्र सरकारच्या अॅडव्हर्स इव्हेंट्स फॉलोइंग इम्युनायझेशन (AEFI) समितीने २ ऑक्टोबर २०२१ रोजी सादर केलेल्या अहवालावर अवलंबून होती, ज्याने कथितपणे कबूल केले की त्यांच्या मुलीचा मृत्यू कोव्हीशिल्डच्या दुष्परिणामांमुळे झाला आहे. याचिकेत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून १००० कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी करण्यात आली होती. आता नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या सुनावणीत या प्रकरणातील पुढील बाजू समोर येणार आहेत.

Covishield Vaccine Girl Death High Court Petition
Legal Corona Serum Institute Compensation Plea

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आशिया चषक: उद्या पुन्हा रंगणार भारत आणि पाकिस्तान सामन्याचा थरार; असे आहे सुपर4चे वेळापत्रक

Next Post

एकनाथ शिंदेंनी राज्यपालांना पहिल्यांदाच लिहिले पत्र; केली ही मागणी; राज्यपाल काय निर्णय घेणार?

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
Shinde Koshyari e1662195161886

एकनाथ शिंदेंनी राज्यपालांना पहिल्यांदाच लिहिले पत्र; केली ही मागणी; राज्यपाल काय निर्णय घेणार?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011