नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – करोनाकाळात घेतलेल्या औषधी, लसीचे वेगवेगळे दुष्परिणाम दिसून येत आहेत. त्यावर विविध देशांमध्ये संशोधन सुरू आहे. कोव्हिडोत्तर आरोग्याच्या समस्या वाढल्याची चिंता सर्वत्र व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर कोव्हिडप्रतिबंधक लस आणि वाढलेले हार्टअटॅकचे प्रमाण या अनुषंगाने आयसीएमआर संशोधन करणार आहे.
कोव्हिडकाळात घेतलेल्या लसीमुळे हार्टअटॅकचे प्रमाण वाढल्याची चर्चा सुरू आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये कोव्हिड प्रतिबंधक लस घेतलेल्यांपैकी तरुणवयातील मुलामुलींचे मृत्यू हार्टअटॅकमुळे झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे कोव्हिड प्रतिबंधक लस खरोखर हार्टअटॅकसाठी कारणीभूत ठरतेय का, यावर चर्चा सुरू झाली आहे. लोकांच्या मनात पडलेल्या प्रश्नांवर आता आयसीएमआर एक स्टडी करत आहे. या स्टडीचा सुरुवातीचा रिपोर्ट येत्या जुलै २०२३ मध्ये प्रकाशित करण्यात येईल.
या रिसर्चमध्ये आयसीएमआर भारतातील युवा लोकसंख्येला कोविड लसीकरण आणि वाढत्या हृदयविकाराच्या घटना यात काही संबंध आहे का याचा शोध घेणार आहे. या स्टडीचा सुरुवातीचा रिपोर्ट काही काळापासून पेंडिंग आहे. हा प्रकाशित करण्याआधी आयसीएमआर आतापर्यंत निष्कर्षावर चर्चा करत आहे. आयसीएमआर रिपोर्टबाबत अतिशय गंभीरपणे अभ्यास करतंय. जोपर्यंत संपूर्ण खातरजमा केली जात नाही तोपर्यंत हा रिपोर्ट सार्वजनिक करण्यात येणार नाही.
अनियमित जीवनशैली कारणीभूत
मागील वर्षात ५० वयापेक्षा कमी ५० टक्के आणि ४० वयापेक्षा कमी २५ टक्के लोकांना हार्ट अटॅकचा धोका पाहायला मिळाला. तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. महिलांच्या तुलनेत पुरुष जास्त हृदयासंबंधित आजाराने ग्रस्त आहेत. हृदयाच्या आजारासाठी ब्लड प्रेशर, तणाव, शुगर, अनियमित जीवनशैली हे मोठे कारण आहे.
यावर राहणार लक्ष
आयसीएमआरच्या संशोधनात तीन गोष्टींवर प्रामुख्याने लक्ष राहणार आहे. यात लोकांचा मृत्यू लसीकरणानंतर नैसर्गिक कारणामुळे झालाय का, कोविड रोखण्यासाठी बनवण्यात आलेली लस मृत्यूसाठी जबाबदार आहे का, मृत्यू होणारा व्यक्तीला कोविडचा गंभीर आजार होता की, दिर्घकाळ तो कोरोनामुळे पीडित होता का यांचा समावेश आहे. यासाठी ४० हॉस्पिटलमधून मागवला डेटा मागविण्यात आला आहे.